AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं हसत हसत उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची त्यांचं नाव न घेता चिरफाड केली.

...तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच, इतिहास बदलण्याच्या आरोपावर मोदींचं हसत हसत उत्तर
नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 08, 2022 | 3:47 PM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर (congress) जोरदार शाब्दिक हल्ला केला. विरोधक नेहमी इतिहास बदलण्याचे आरोप करतात. त्याल्याही त्यांनी उत्तर दिले. शिवाय छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव येणारच, असे हसत-हसत सांगितले. मोदी म्हणाले की, आम्हाला केवळ काही लोकांची मेमरी पॉवर वाढवायची आहे. आम्ही काही इतिहास बदलणार नाही. काही लोकांचा इतिहास काही वर्षांपासून सुरू होत आहे. आम्ही त्यांना थोडं मागे घेऊन जात आहोत. त्यांना 50 वर्षांच्या इतिहासात आनंद वाटत असेल, तर आम्ही त्यांना 100 वर्ष मागे घेऊन जात आहोत. त्यांना 100 वर्षांच्या इतिहासात आनंद वाटत असेल, तर आम्ही त्यांना 200 वर्ष मागे घेऊन जात आहोत आणि त्यांना 200 वर्षांच्या इतिहासात आनंद वाटत असेल, तर मग आम्ही त्यांना 3– वर्ष मागे घेऊन जाऊ शकतो. आणि जर 300 ते 350 वर्ष मागे गेलो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येणारच येणार. आम्ही त्यांची मेमरी अधिक ब्रॉड करत आहोत. त्यांचे विचार बदलत नाही. काही लोकांचा इतिहास केवळ एकाच कुटुंबापर्यंत मर्यादित आहे. त्याला काय करणार. इतिहासाचे अनेक पैलू आहेत, पदर आहेत. चढउतार आहेत. आणि आम्ही इतिहासाचा दीर्घकालीन कालखंड समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण गौरवपूर्ण इतिहास विसरणे हे या देशासाठी योग्य नाही. ते आपलं दायित्व आहे. म्हणूनच येणाऱ्या २५ वर्षात देशाला पुढे घेऊन जाण्याचा आम्ही संकल्प केला आहे, अशा निश्चय त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचा समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची त्यांचं नाव न घेता चिरफाड केली. गुजरातमध्ये एक गोष्ट बोलली जाते. महाराष्ट्रातही तीच बोलली जात असेल. कदाचित शरद पवारांना माहीत असेल. जेव्हा हिरवळ असते, शेत-शिवार हिरवगार झालेलं असतं आणि कुणी जर ती हिरवळ पाहिली असेल तर त्याच वेळी अपघात होऊन त्याचे डोळे गेले तर आयुष्यभर त्याला तो हिरवं चित्रं दिसत असतं. तसंच 2013पर्यंत दुर्दशेत दिवस काढले. 2014मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना ते जुने दिवसच दिसणार, असा हल्लाच मोदींनी राहुल गांधींवर लगावला.

पवारांचे कौतुक

सार्वजनिक जीवनात चढ उतार येत असतात. जय-पराजय होत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही असं असतं का? कोणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. आपल्याला नाराज होण्याची गरज नाही. तुम्ही नाराज होत असाल तर तुमचे जे मतदारसंघ आहेत तिथले लोकही उदास होतील, असा हल्लाही त्यांनी चढवला.

मंगेशकरांना काढून टाकलं

नरेंद्र मोदी म्हणाले की, लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झालाय. लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होते, पण त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला. हे जाणून घ्या…पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होत, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलंय, असा दावा मोदींनी केला.

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi: अचानक दृष्टी गेल्यानंतर जसं होतं तसंच 2014नंतर सत्ता गमावल्यावर काँग्रेसचं झालंय; पंतप्रधान मोदींचा घणाघाती हल्ला

अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ

Modi on Pawar | अवघ्या काही मिनिटात शरद पवारांचं मोदींकडून तीनदा कौतुक, काय म्हणाले पंतप्रधान?

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा