मोदींच्या हस्ते आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण; शंकराचार्यांनी केला होता केदारनाथ मंदिराचा जिर्नोद्धार

| Updated on: Nov 05, 2021 | 11:30 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केदारनाथ दौऱ्यावर आहेत.  आपल्या या दौऱ्यामध्ये मोदींनी चारधाम पैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण केले

मोदींच्या हस्ते आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण; शंकराचार्यांनी केला होता केदारनाथ मंदिराचा जिर्नोद्धार
Follow us on

दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केदारनाथ दौऱ्यावर आहेत.  आपल्या या दौऱ्यामध्ये मोदींनी चारधाम पैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराला भेट दिली. मोदींनी केदारनाथ मंदिरात पूजा केली. पूजेनंतर मोदीच्या हस्ते केदारनाथचा रुद्राभिषेक आणि आरती देखील करण्यात आली. आरतीनंतर मोदींनी केदारनाथ परिसराची पाहाणी केली. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथमध्ये उभारण्यात आलेल्या आदि शंकराचार्यांच्या 12 फूट मूर्तीचे अनावरण करण्यात आले. विषेश म्हणजे मोदीच्या या दौऱ्याचे प्रक्षेपण 12 ज्योतिर्लिंगांसह एकूण 100 ठिकाणी लाईव्ह सुरू आहे. केदारनाथ मंदिरातील प्रमुख पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात मोदींनी बाबा केदारनाथची पूजा केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मोदींचा हा सोहळा लाईव्ह पाहिला.

विकास कामांचे उद्धघाटन 

केदारनाथ धाम हा चार धामपैकी एक प्रमुख धाम आहे. तसेच केदारनाथच्या मंदिराचा समावेश हा  12 ज्योतिर्लिंगांमध्ये होत असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिरांचा जिर्नोद्धार आदि शंकराचार्यांनी केला होता. सध्याचे केदारनाथ मंदीर हे पांडवकालीन मंदिराच्या शेजारी आहे. पंतप्रधान मोदींनी आज आदि शकंराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण केले. तसेच या परिसरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या केदारनाथपुरीचे उद्धघाटन देखील मोदींच्या हस्ते करण्यात आले.

मैसूरमध्ये मूर्तीची निर्मिती 

आदि शकंराचार्य यांनी केदारनाथमध्ये समाधी घेतली होती. उत्तराखंड सरकारकडून या समाधीस्थळा परिसरात विविध विकास कामे करण्यात आली आहे. त्याचे देखील उद्धघाटन मोदींच्या हस्ते आज पार पडले. मोदींनी आज शंकराचार्यांच्या ज्या मूर्तीचे अनावरण केले, ती मूर्ती 12 फूट असून, तीचे वजन तब्बल 35 टन आहे. कर्नाटक राज्यातील मैसूरमध्ये या मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानंतर तीला  केदारनाथमध्ये आणण्यात आले.

PM Modi Kedarnath: पंतप्रधानांकडून केदारनाथमध्ये 130 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन

Prime Minister Narendra Modi : ‘सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब’ म्हणंत जवानांसोबत साजरी केली ‘दिवाळी’