
यंदा मान्सूनच्या सरी मनसोक्त बरसणार असल्याची सुखद बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. आपला देश शेतीप्रधान असून जीडीपीच्या 60 टक्के उत्पन्न कृषीजन्य उत्पादनातून मिळते. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे. दरवर्षी बळीराजा शेतकरी पावसाच्या ढगांची चातकासारखी वाट पाहात असतो. यंदा सरासरी पेक्षा जादा पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले जात आहे. मान्सून हा प्रकार नेमका काय असतो ? जगात अन्यत्र कुठे-कुठे मान्सून सारखा पाऊस बरसतो. त्याला मान्सून का म्हणतात ? हा मान्सून नेमका तयार तरी कसा होतो आणि नेमका येतो तरी कुठून याचा घेतलेला आढावा… नेमेचि येतो पावसाळा असे म्हटले जाते….परंतू मान्सून अंदमानात आधी दाखल होतो. तो अंदमानात आला की आपल्याला हायसं वाटतं. बस्स आता आणखी वाट पाहावी लागणार नाही. मजल दर मजल करीत पाऊस केरळात दाखल होतो. त्यानंतर मुंबईत तो जूनच्या साधारण पहिल्या आठवड्यात आपली वर्दी देतो. या पाऊसाची आपण माहीती घेणार आहोत....