AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने वाढवले थेट उद्धव ठाकरे यांचे टेन्शन, व्हायरल व्हिडीओने मोठी खळबळ…

राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. भाजपाने या निवडणुकीत मोठी बाजी मारली. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलल्याचे बघायला मिळत आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने वाढवले थेट उद्धव ठाकरे यांचे टेन्शन, व्हायरल व्हिडीओने मोठी खळबळ...
Kalyan Dobinvali Municipal Corporation
| Updated on: Feb 04, 2026 | 8:30 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. अनेक महापालिकांवर भाजपाची एकहाती सत्ता आली. राज्यात युतीत असलेले पक्ष महापालिका निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत मोठे अपयश मिळाले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक लढवली. तरीही भाजपाचीच दोन्ही महापालिकेत सत्ता आली. एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ली होता. कल्याण डोबिंवली महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याच्या नजरा होत्या. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत महापालिका निवडणूक लढवली. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, उल्हासनगर या महापालिकांसह अनेक ठिकाणी एकत्र येत शिवसेना शिंदे गट आणि भाजपाने निवडणूक लढवली.

शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाने महापालिका निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवल्या. मात्र, असे असतानाही आता निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जवळीकता वाढल्याचे बघायला मिळत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणाची पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

कल्याण डोबिंवली महापालिकेत महापौर उपमहापौर यांच्या निवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाकरे गटनेते उमेश बोरगावकर व पक्षप्रतोद संकेश भोईर यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देत स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. केडीएमसी निवडणुकीदरम्यान महायुती विरुद्ध ठाकरे गट–मनसे अशी लढत निवडणुकीनंतर बघायला मिळाली.

शिंदे गटाने मनसेसोबत मिळून गटस्थापन केली. ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी 4 बेपत्ता आहेत. बेपत्ता नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या भेटीनंतर ठाकरे गटात संभ्रम बघायला मिळत आहे. राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, यावर सध्यातरी ठाकरे गटाने माैन बाळगल्याचे बघायला मिळत आहे. यावेळीच्या महापालिका निवडणुकीवेळी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळत आहे. राजकीय पक्ष कुठे युती म्हणून तर कुठे विभक्त निवडणुका लढताना दिसत आहेत.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.