AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख ठरली! मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला ठरणार, पडद्यामागे मोठ्या हालचाली

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीची तारीख आता ठरली आहे. सर्व प्रशासकीय तयारी चालू झाली आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी मतदान केले जाईल.

तारीख ठरली! मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला ठरणार, पडद्यामागे मोठ्या हालचाली
bmc mayor electionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 02, 2026 | 5:32 PM
Share

BMC Mayor Selection : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महानगरपालिका निवडणुकीची सगळीकडे चर्चा होती. या निवडणुकीत राज्यभरात एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूक झाली होती. या सर्व महापालिकांपैकी मुंबईची महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कारण या पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली जात होती. मुंबई पालिकेच्या निवडणुकीमुळे या दोन्ही भावांच्या युतीची ऐतिहासिक घटना घडली. परंतु या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता मुंबईच्या महापौरपदी नेमकं कोण बसणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता आता संपलेली आहे. कारण येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना त्यांचा नवा महापौर मिळणार आहे.

11 तारखेला मतदान होणार

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या नव्या महापौराच्या निवडीसाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे. या निवडीसाठी येत्या 6 फेब्रुवारी रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. त्यानंतर महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल.

महापौरपदासाठी नेमकी कोणाची निवड?

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या महापौरपदासाठी महायुतीत बराच खल चालू होता. निवडणुकीचा निकाल लागताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये हालवले होते. घोडेबाजार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाला मुंबईचे महापौरपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर असल्यामुळे महापौरपदाच्या निवडीची चर्चा रखडली होती. आता फडणवीस परतले असल्याने शिंदे गट आणि भाजपा यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईला महापौर मिळणार आहे.

मुंबईचा महापौर कोण होणार?

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ठाणे, कल्याण डोंबिवली एकनाथ शिंदे यांना तर मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर असे गणित ठरल्याचे सांगितले जात आहे. असे असताना आता मुंबईचा नवा महापौर नेमका कोण होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना