Kerala case : आईचं पोटच्या मुलीसोबत भयानक कांड, न्यायालयही हादरलं, महिलेला सुनावली 180 वर्षांची शिक्षा

केरळमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, आई आणि मुलांच्या नात्यावरील विश्वासच उडून जावा एवढी ही घटना भयावह आहे, या प्रकरणात आरोपी महिलेला 180 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Kerala case : आईचं पोटच्या मुलीसोबत भयानक कांड, न्यायालयही हादरलं, महिलेला सुनावली 180 वर्षांची शिक्षा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2025 | 10:00 PM

केरळमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, आई आणि मुलांच्या नात्यावरील विश्वासच उडून जावा एवढी ही घटना भयावह आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या बारा वर्षांच्या मुलीवर आपल्या प्रियकराला बलात्कार करायला लावला आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यानं न्यायालयानं या आरोपी महिलेला आणि तिच्या प्रियकराला तब्बल 180 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 11 लाख 70 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे, दंड न भरल्यास अतिरिक्त वीस महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष POSCO कोर्टाचे न्यायाधीश अशरफ ए. एम यांनी या दोन आरोपींना विविध कलमांतर्गत ही शिक्षा सुनावली आहे.

कोर्टानं या प्रकरणातील प्रत्येक गु्न्ह्यांसाठी या दोघांना प्रत्येकी 40-40 वर्षांची शिक्षा तसेच दोन -दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. जर दंड भरला नाही तर अतिरिक्त वीस महिन्यांची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. अशा प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना जी शिक्षा झाली आहे, त्यातील ही सर्वात कठोर शिक्षा मानली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही आरोपी महिला आपल्या पतीसोबत तिरुवनंतपुरममध्ये राहत होती, त्याचवेळी तिची मैत्री तेथील एका व्यक्तीसोबत झाली, ही महिला त्या व्यक्तीच्या प्रेमात पडली, त्यानंतर आरोपी महिला आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली. ती सोबत आपल्या मुलीला देखील घेऊन गेली. डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 या काळात ते मलप्पूरममध्ये एका घरात रेंटवर राहत होते. या काळात या महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं पीडित मुलीवर प्रचंड अत्याचार केले, ते दोघेही या मुलीला दारू पाजत होते, तसेच या महिलेचा प्रियकर त्या मुलीवर अत्याचार करत होता, या कामात ही महिला देखील त्याची साथ देत होती, मात्र प्रकरण समोर येताच या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली, गुन्हा सिद्ध होताच त्यांना तब्बल 180 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.