Mother’s Day 2022 : या माध्यमातून आपल्या आईला द्या सप्राईज

जर तुमच्या आईला प्रवास करायला आवडत असेल आणि निसर्गावर प्रेम असेल, तर हिरव्यागार अशा स्थाळावर एखादी छोट्याशा सहलीची योजना करा. हे तिला आश्चर्यचकित करणारं असेल. यात तुम्हाला तुमच्या आई सोबत आणखी जवळ आनेल.

Mother's Day 2022 : या माध्यमातून आपल्या आईला द्या सप्राईज
मदर्स डे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 6:00 AM

नवी दिल्ली: जगात सगळ्यात सुंदर शब्द म्हणजे आई (Mother). आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. त्यामुळे प्रत्येक धर्मात आईला उच्च आणि महत्वाचे स्थान दिले आहे. इस्लाम धर्मात तर ‘बेशक मां के कदमों तले जन्नत है’ असं म्हटलं जातं आणि त्यापद्धतीने आईवर प्रेम ही केलं जातं. तसचं प्रेम प्रत्येक व्यक्ती आपल्या आईवर करतोच. त्यामुळे आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा आईच्या चेहऱ्यावर हास्य (A smile on his face) फुलविण्याचा प्रयत्न करा. आणि तर नामी संधी आपल्या सर्वांसाठी चालून आलेली आहे. मदर्स डे (Mother’s Day) निमित्ताने आईच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा यापेक्षा चांगला योग असूच शकत नाही. पण उद्या येणाऱ्या मदर्स डे (रविवारी 8 मे रोजी) आता काही तासच शिल्लक असल्याने आम्ही दिलेल्या काही पर्यांवर आपण नक्कीच विचार करू शकता आणि आपल्या आईसाठी हा दिवस आणखी स्पेशल बनवू शकतो…

1. तिच्या आवडत्या सलूनमध्ये मसाज बुक करा

मदर्स डे म्हणजे आपल्या आईला कामाची जबाबदारीतून मुक्त करण्याचा आणि तिला ‘थोडी उसंत देण्याचा दिवस’. मात्र या दिवशी तिला स्वत: साठी मसाज मिळाला तर. हे किती आरामदायी असेल ना. काही काळासाठी तिचा सर्व ताण आणि चिंता दूर करण्याचा मसाज हा एक उत्तम मार्ग आहे. तर मग या मदर्स डेवर आपल्या आईसाठी तिच्या आवडत्या सलूनमध्ये मसाज बुक का करू नये? तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आईसाठी सर्वोत्तम मसाज सेवा देखील देऊ शकता.

2. आईसोबत चित्रपट पहायला जा

हा मदर्स डे आपण फिल्मी स्टाईलने साजरा करू शकता. जर आपली आई ही मोवी लव्हर असेल आणि तिला चित्रपट पहायला आवडत असेलतर आपण आईसोबत चित्रपट पहायला रविवारी जाऊ शकता. मग पहा जवळच्या चित्रपटगृहात कोणता सिनेमा लागला आहे आणि त्यानुसार तिकीट आजच बुक करा. तसेच पॉपकॉर्न घ्यायला विसरू नका. आणि जर कोरोनामुळे घराबाहेर पडण्याबद्दल शंका असेल, तर तिच्यासोबत सोफ्यावर घरीच आईचे आवडता चित्रपट पहा.

हे सुद्धा वाचा

3. आवडती डिश बनवा

आईच्या हातचं खायला कोणाला आवडत नाही. मात्र या मदर्स डे तिच्या हातांना जरा विश्रांती द्या आणि तुमच्या हातांची चव तिला दाखवा. हे तिच्यासाठी कोणत्याही गिफ्ट पेक्षा कमी नसेल. तर या मदर्स डे शेफची टोपी घाला आणि आईला न विचारता तिच्या आवडीचा पदार्थ बनवा. जो तिच्या सदा स्मरणार्थ राहील.

4. लहानशा सहलीची योजना करा

जर तुमच्या आईला प्रवास करायला आवडत असेल आणि निसर्गावर प्रेम असेल, तर हिरव्यागार अशा स्थाळावर एखादी छोट्याशा सहलीची योजना करा. हे तिला आश्चर्यचकित करणारं असेल. यात तुम्हाला तुमच्या आई सोबत आणखी जवळ आनेल. विशेष म्हणजे, या मदर्स डेला अनेक ट्रॅव्हल कंपन्या आश्चर्यकारक सवलती देत ​​आहेत, त्यामुळे तुमच्या सुट्टीच्या ठिकाणी हॉटेल्स बुक करण्यापूर्वी ते तपासायला विसरू नका.

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.