Mahatma Gandhi : पत्रे, चप्पल आणि चष्मा… राष्ट्रपिता महात्मा गांधींशी संबंधित वस्तूंचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव, 70 ऐतिहासिक वास्तू देखिल विकल्या जाणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तूंचा लिलाव होणार आहे. त्यात चप्पलांच्या दोन जोड्यांचाही समावेश आहे.

Mahatma Gandhi : पत्रे, चप्पल आणि चष्मा... राष्ट्रपिता महात्मा गांधींशी संबंधित वस्तूंचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव, 70 ऐतिहासिक वास्तू देखिल विकल्या जाणार
राष्ट्रपिता महात्मा गांधीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 7:13 PM

नवी दिल्ली : देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या ज्या वस्तू असतील त्या जपल्या जातात. अशा अनेक वस्तू या भारतात आहेत. तसेच त्यांच्या काही वस्तू या इतर ही ठिकाणांवर आहेत. त्यातील काही वस्तूंचा लिलाव हा यूकेमध्ये होणार आहे. या लिलावातून पाच कोटींहून अधिक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी यांच्या लिलाव करण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये त्यांची लंगोटी, लाकडी चप्पल आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटचे छायाचित्र (photograph) यांचा समावेश आहे. डेली मिररच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रपिता यांच्याशी संबंधित एकूण 70 वस्तूंचा लिलाव होणार आहे. यातील काही गोष्टी महात्मा गांधींशी संबंधित आहेत, तर काही त्यांनी वापरल्या होत्या. त्यात तुरुंगात असताना लिहिलेल्या पत्रांचाही (letters) समावेश आहे.

इस्ट ब्रिस्टल लिलावात सुमारे 5 कोटी रुपये सहज मिळतील असा विश्वास आहे. या लिलावगृहाने यापूर्वी 2020 मध्ये राष्ट्रपित्याच्या चष्म्यांचा 2.5 कोटी रुपयांना लिलाव केला होता. “या वस्तू खरोखरच मी लिलावात पाहिलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत,” लिलावकर्ता अँड्र्यू स्टोव म्हणतात. हा संग्रह आपल्या जगाच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या वस्तू लोकांच्यात रोमांच भरेल. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गांधीजींचे ते छायाचित्र, जे त्यांच्या आयुष्यातील शेवटचे चित्र मानले जाते.

लिलाव होणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधींचे चित्र

वास्तविक, हे चित्र तिथेच काढण्यात आलं होतं जिथ महात्मा गांधी यांची हत्या तीन आठवड्यांनंतर करण्यात आली होती. या चित्रात ते ज्या खुर्चीवर बसले होते, तीच ही खुर्ची आहे ज्यावर ते खुनाच्या दिवशी ही बसले होते. अँड्र्यू म्हणाले, ‘ही एक अतिशय खास वस्तू आहे, ज्याचा सहज एक लाख रुपयांमध्ये लिलावात जाईल.’ तर आमचे असे म्हणणे आहे की, त्यांचा हा फोटो त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी काढला असावा आणि हे त्याचे शेवटचे ज्ञात छायाचित्र असू शकते. जे त्यांच्या हत्त्येच्या आधी काढले होते.’ हे न पाहिलेले छायाचित्र 1947 मध्ये दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे काढण्यात आले होते. यामध्ये ते एका खुर्चीवर बसले आहेत.

हे सुद्धा वाचा

कमरपट्ट्याचाही लिलाव होणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनेक वस्तूंचा लिलाव होणार आहे. त्यात चप्पलांच्या दोन जोड्यांचाही समावेश आहे. जी 15 लाख ते 25 लाखांमध्ये लिलाव होण्याची शक्यता आहे. लिलाव होणार्‍या वस्तूंमध्ये हाताने बनवलेल्या कमरपट्ट्याचाही समावेश आहे. जो दांडीयात्रा सुरू होण्यापूर्वी गांधीजींना देण्यात आला होता. त्याचाही सहा ते आठ लाखांपर्यंत लिलाव होण्याची शक्यता आहे. याशिवाय पूण्यातील तुरुंगात असताना लिहिलेल्या पत्राचाही लिलाव होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या चष्म्याचाही लिलाव होणार आहे.

Non Stop LIVE Update
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास
हा रस्ता की नदी... पूर आल्यानं चिमुरड्यांसह वृद्धांचा जीवघेणा प्रवास.
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका
तुम्ही पवार-काँग्रेसची रखेल आहात का? शिरसाटांची जीभ घसरली, कुणावर टीका.
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी जरा दमानं घ्यावं, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?
सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार? भाजपचा आक्रमक, प्रकरण काय?.
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय
Mumbai Rain Forecast: येत्या 24 तासात कसा पावसाचा जोर? IMDचा अंदाज काय.