UP Crime : लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलीची आत्महत्या

ही संपूर्ण घटना बांदा जिल्ह्यातील मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. घटनेने दुखावलेल्या पीडित मुलीने दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली. पीडितेच्या बहिणीने सांगितले की, तिची आई मानसिकदृष्ट्या अपंग आहे. घटना घडली, त्यावेळी तिघेही एकत्र झोपले होते. त्यानंतर आरोपी पित्याने बहिणीला वासनेची शिकार बनवले.

UP Crime : लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलीची आत्महत्या
लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
Image Credit source: TV9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 07, 2022 | 3:41 PM

लखनऊ : बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या निर्दयी बापाने आपल्याच मुलीवर बलात्कार (Rape) केला. बापाच्या या अत्यंत क्रूर, हैवानी कृत्याला कंटाळून पीडित मुलीने आत्महत्या (Suicide) स्वतःचे जीवन संपवले. दारुड्या पित्याने नैतिकता सोडून स्वतःच्याच मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले. त्यामुळे बापाच्या कृत्यावर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून हकनाक बळी ठरलेल्या निष्पाप मुलीच्या मृत्यूबद्दल नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत. (A drunken father sexually abused his own daughter, the victim committed suicide in Lucknow)

मुलगी गाढ झोपेत असताना केला लैंगिक अत्याचार

निर्दयी पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला. आरोपी दारू प्राशन करून आला होता. गुरुवारी रात्री उशिरा सर्व लोक घरात असताना आरोपी बाप व्हरांड्यात झोपला होता. त्याने खूप दारू प्यायली होती. रात्री सगळे झोपल्याचा अंदाज त्याने घेतला. याचवेळी त्याची मुलगीही गाढ झोपेत असल्याचे पाहिले. ती झोपेत असतानाच आरोपीने बाप-मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत मुलीवर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच कुटुंबियांसह परिसरातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अत्याचाराच्या दुसऱ्या दिवशी पीडितेची आत्महत्या

ही संपूर्ण घटना बांदा जिल्ह्यातील मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. घटनेने दुखावलेल्या पीडित मुलीने दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली. पीडितेच्या बहिणीने सांगितले की, तिची आई मानसिकदृष्ट्या अपंग आहे. घटना घडली, त्यावेळी तिघेही एकत्र झोपले होते. त्यानंतर आरोपी पित्याने बहिणीला वासनेची शिकार बनवले, असे तक्रारदार बहिणीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. बांदाचे एएसपी लक्ष्मी निवास मिश्रा यांनी सांगितले की, मृत मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करीत आहेत. मृत मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टमचा अहवाल प्राप्त होताच आरोपीवर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (A drunken father sexually abused his own daughter, the victim committed suicide in Lucknow)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें