कोचिंग क्लासच्या शिक्षकाला सोबत घेऊन विद्यार्थिनीच पळाली, आता पाठवला व्हिडिओ, म्हणाली.. ‘ घरचे मारण्यावर टपलेत, आता जगू किंवा मरु ते एकत्रच’

या व्हिडिओत या विद्यार्थिनीने घरच्यांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आता पळून आल्यानंतर घरातील सगळेजण आपल्याला मारण्याच्या तयारीत असल्याचे या व्हिडीओत तिने म्हटले आहे. घरच्यांनी आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचेही ती या व्हिडीओत सांगते आहे. आता आम्ही दोघांनाही लग्न केले आहे. आपल्या कुटुंबाने दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचेही तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

कोचिंग क्लासच्या शिक्षकाला सोबत घेऊन विद्यार्थिनीच पळाली, आता पाठवला व्हिडिओ, म्हणाली.. ' घरचे मारण्यावर टपलेत, आता जगू किंवा मरु ते एकत्रच'
Bihar Girl video
Image Credit source: internet
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 07, 2022 | 2:32 PM

पटना एक विद्यार्थिनी आपल्या शिक्षकाला ( Student loves teacher) सोबत घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पळून गेल्यानंतर या विद्यार्थिनीने एक व्हिडिओ ( Viral Video)घरच्यांना पाठवला आहे, त्याला शिक्षकाला सोबत घेऊन पळाल्याचे सांगत तिने घरच्यांपासून सुरक्षा मिळावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. बिहारच्या (Bihar)पश्चिम पंचारण जिल्ह्यात हे वेगळं प्रेमप्रकरण समोर आलं आहे. या विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ही विद्यार्थिनी शिक्षकासोबत लग्न केले असल्याचे सांगते आहे. ती या व्हिडिओत सांगते की ती स्वता शिक्षकाला सोबत घेऊन पळाली आहे. त्या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरु असल्याचेही तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

काय आहे या विद्यार्थिनीच्या व्हिडीओत

विद्यार्थिनी या व्हिडीओत सांगते की गेल्या काही काळापासासून शिक्षक आणि माझे प्रेमप्रकरण सुरु होते. या शिक्षकांकडे मी कोचिंग क्लासला जात असे. त्याचवेळी आमचं प्रेमप्रकरण सुरु झालं. तीन महिन्यांपूर्वी मी कोचिंग क्लास सोडला. याबाबत मी जेव्हाही घरात विषय काढत असे, तेव्हा घरात विरोध होत होता. यावरुन मला घरात मारहाणही करण्यात येत असे. त्यामुळे मी प्रेमी शिक्षकाला सोबत घेऊन मी पळून आले आहे. आता जर जगू किंवा मरु तर त्या प्रियकर शिक्षकासोबत. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. मात्र अद्याप या व्हिडिओची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

घरच्यांपासून सुरक्षेची केली मागणी

या व्हिडिओत या विद्यार्थिनीने घरच्यांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आता पळून आल्यानंतर घरातील सगळेजण आपल्याला मारण्याच्या तयारीत असल्याचे या व्हिडीओत तिने म्हटले आहे. घरच्यांनी आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचेही ती या व्हिडीओत सांगते आहे. आता आम्ही दोघांनाही लग्न केले आहे. आपल्या कुटुंबाने दाखल केलेला गुन्हा चुकीचा असल्याचेही तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

हा सर्व प्रकार नवलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ज्या परिसरातून ही विद्यार्थिनी शिक्षक पसार झाले आहेत. या विद्यार्थइनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनतर या विद्यार्थिनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती नसल्याचे पोलीस अधिकार्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या दोघांचाही युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें