तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. संसद भवनाकडे मोर्चा निघाल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण बघायला मिळाले. पोलिसांनी लाठीचार्जही केला. आता प्रियंका गांधी यांनी मोठे आरोप केले.

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..
Priyanka Gandhi
| Updated on: Jul 22, 2026 | 7:40 AM

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत मोठे आंदोलन सुरु आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. मात्र, संसदेवर मोर्चा निघाल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक पोलिस आणि आंदोलक जखमी झाले. आंदोलक अजूनही आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांनी मैदान सोडलं नाही. काल अनेक राजकीय नेते जंतर मंतर मैदानावर पोहोचले. यासोबतच पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. संजय राऊत दुपारीच जंतर मंतरवर पोहोचले होते. या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. देशभरातून लोक यांना समर्थन करण्यासाठी पोहोचत आहेत. यासोबतच देशाच्या विविध भागात आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. काल याच मुद्द्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन केले.

यावेळी मोठी गर्दी जमली होती. फक्त धर्मेंद्र प्रधान हेच नाही तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच प्रियंका गांधी यांनी मोठे आरोप केले. प्रियंका गांधी यांनी म्हटले की, बघा माझा भाऊ खूप जास्त ताकदवान आहे. जे काही आहे ते सहन करेल. विद्यार्थ्यांसोबत जे झाले ते एकदम चुकीचे आहे. ते आपले लेकरं आहेत, भविष्य आहेत आणि देशाचे तरूण आहेत.

ज्यावेळी आम्ही संसदेत म्हणतो की, आम्हाला चर्चा पाहिजे, त्यावेळी हे म्हणतात की वंदे मातरमच्या मुद्द्यात आपण चर्चा करत आहोत… पण वंदे मातरमचा अर्थ काय आहे? आपली मातृभूमी काय आहे कोणाची आहे? जर आपण आपल्या तरूणांनाच वाचू शकत नाही, त्यांना सुरक्षित ठेऊ शकत नाहीत. तुम्ही शिक्षण प्रणालीमध्ये बदल करण्याचे बिल आणा ना..

पेपरफुटीविरोधात बिल आणा चर्चा करा. विद्यार्थ्यांचे ऐका.. विद्यार्थी नक्की काय बोलत आहेत ते ऐका. परीक्षेचे पेपर वारंवार लिक होत आहेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात? जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. जे दोषी आहेत, पेपरफुटीसाठी त्यांना तुम्ही कधी पकडणार, त्यांना कधी मारणार? तुम्ही विद्यार्थ्यांना अटक करत आहात? मुली दवाखान्यात आहेत, ही लोकशाही आहे?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us