AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलेट ट्रेनचा महत्वाचा टप्पा, 100 मीटर लांब अन् चार मजली इमारतीचा पूल तयार

bullet train project bridge: मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाइन निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरु आहे. गुजरातमधील नऊ आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून ही बुलेट रेल्वे जाते. महाराष्ट्रातून 156 किमी, नगर हवेलीत 4 किमीचा रेल्वे मार्ग आहे.

बुलेट ट्रेनचा महत्वाचा टप्पा, 100 मीटर लांब अन् चार मजली इमारतीचा पूल तयार
bullet train project bridge
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 26, 2024 | 6:02 PM
Share

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सुरु होणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. सिलवासा, दादरा आणि नगर हवेली दरम्यान 100 मीटर लांब आणि चार मजली इमारतबरोबर असणारा पूल तयार केला गेला आहे. हा पूल तामिळनाडूमधील त्रिचीमध्ये तयार केला गेला. त्यानंतर ट्रेलर अन् ट्रन्सपोर्टच्या माध्यमातून मुंबईत आणला गेला. हा पूल जोडताना त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांचा जणू श्वासच थांबला होता.

प्रकल्पात एकूण 28 पूल

नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशननुसार 508 किमी लांब मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्‍टमध्ये एकूण 28 स्‍टील ब्रिज आहे. त्यातील दादरा आणि नगर हवेली येथील पूल चौथा आहे. हा पूल 1464 मेट्रीक टनाचा आहे. त्याची उंची 14.6 मीटर आणि रुंदी 14.3 मीटर आहे. हा संपूर्ण पूल ”मेक इन इंडिया”चा प्रकल्पावर आधारित आहे. त्यासाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेची उच्च पातळी राखून बुलेट ट्रेन प्रकल्प तयार केला जात आहे. जपानी तंत्रज्ञाचा फायदा घेऊन “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत हा मार्ग तयार होत आहे. भारत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतःची तांत्रिक आणि भौतिक संसाधने वाढवत आहे. या प्रकल्पासाठीचा हा पोलादी पूल त्याचे उदाहरण आहे.

bullet train project bridge

असा आहे प्रकल्प

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाइन निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरु आहे. गुजरातमधील नऊ आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून ही बुलेट रेल्वे जाते. महाराष्ट्रातून 156 किमी, नगर हवेलीत 4 किमीचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पात 12 स्‍टेशन बनवण्यात येणार आहे. रेल्वेचा वेग 320 किमी प्रतीतास असणार आहे. या रेल्वेमुळे मुंबई ते अहमदाबाद अंतर दोन तासांत गाठता येणार आहे.

बुलेट ट्रेन सहा मार्गांवर चालवण्याची योजना

बुलेट ट्रेन सहा मार्गांवर चालवण्याची योजना आहे. दिल्‍ली- अमृतसर, हावडा-वाराणसी-पटना, दिल्ली-आग्रा- लखनऊ-वाराणसी, दिल्ली –जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, मुंबई-नाशिक-नागपूर, मुंबई-हैदराबाद कॉरिडोर असे हे मार्ग आहेत.

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात