AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचन याचा मृत्यू, तिहार तुरुंगात तब्येत बिघडल्याने रुग्णालयात होता दाखल

बंदी असलेली अतिरेकी संघटना स्टूडेंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा ( सिमी ) माजी सदस्य साकिब नाचन याचा शनिवारी दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचन याचा मृत्यू, तिहार तुरुंगात तब्येत बिघडल्याने रुग्णालयात होता दाखल
Mumbai blasts accused Saqib Nachan dies
| Updated on: Jun 28, 2025 | 7:07 PM
Share

बंदी घातलेली संघटना सिमी ( SIMI ) संघटनेचा माजी सदस्य असलेला साकीब नाचन याचा दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. साकीब नाचण हा भिवंडीतील पघडा येथे राहणारा असून त्याच्यावर २००२ ते २००३ दरम्यान मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार असल्याचा आरोप होता.

सिमीचा अतिरेकी साकीब नाचन याचा दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ६३ वर्षीय साकीब याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. एनआयएने साल 2023 मध्ये इसिसशी संबंध असल्यावरुन त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.

प्रतिबंधित अतिरेकी संघटना स्टूडेंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे ( सिमी ) माजी सदस्य साकिब नाचन याचा शनिवारी २८ जून रोजी दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तपासले असता त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

पडघा गावात वर्चस्व

मुंबईपासून ५३ किमीवर असलेल्या बोरिवलीतील पडघा या गावातील एका कोकणी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या साकीब नाचन याचे कुटुंब प्रतिष्ठीत आहे. मुस्लीम समुदाय एक प्रमुख नेते अब्दुल हमीद नाचन यांचा हा तिसरा मुलगा होता. त्याला ११ भावंडे होती.

वाणिज्य शाखेचा पदवीधर

वाणिज्य पदवीधर असलेल्या नाचन याचे १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला जमात-ए-इस्लामी या विद्यार्थी संघटनेशी संबंध जुळले. त्यानंतर स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया ( SIMI ) संघटनेचा तो सक्रीय सदस्य झाला. या संघटनेने मुंबईत २००२ ते २००३ दरम्यान बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप आहे. सय्यद अब्दुल करीम उर्फ ​​टुंडा आणि भटकळ बंधूं या अतिरेक्यांशी साकीबचा संबंध होता. शस्त्र प्रशिक्षणासाठी अनेक भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवण्यास मदत केल्याचाही त्याच्यावर आरोप होता.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.