योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडून जाईल; प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचा इशारा

| Updated on: Jul 18, 2021 | 1:20 PM

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (munawwar rana to leave up)

योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास उत्तर प्रदेश सोडून जाईल; प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचा इशारा
Munawwar Rana
Follow us on

लखनऊ: प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल, असा इशाराच मुनव्वर राणा यांनी दिला आहे. (Munawwar Rana says he will leave UP if Yogi re-elected as CM)

घर विकणे आहे, असा बोर्ड मी माझ्या घरावर लावेल. माझा योगींना आक्षेप नाही. पण योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आवश्यक नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून देईल, असं राणा म्हणाले. यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. हैदराबादहून आलेल्या ओवेसींमुळे उत्तर प्रदेशात योगींचं सरकार बनत असेल तर मी सिंह आहे आणि कोलकात्यातही सिंह राहतात. मी कोलकात्याला राहायला जाईल, असं सांगतानाच ओवेसी मतांचं विभाजन करत असल्याचा दावा राणा यांनी केला.

हैदराबादेत गाढवं राहतात

मुसलमानांच्या हिताचं राजकारण करण्याचा दावा करणारा व्यक्ती आता स्वत:ला लैला म्हणवून घेत आहे. या पेक्षा लज्जास्पद बाब काय असेल?, असा सवाल करतानाच सिंह हैदराबादमध्ये नाहीत. तर मैसूरमध्ये आहेत. हैदराबादेत तर गाढवं राहत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी ओवेसींवर केली.

इंदिरा गांधींना विरोध करणारे…

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला जाणार आहे. त्यावरूनही त्यांनी योगी सरकारवर टीका केली. जे लोक इंदिरा गांधींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा विरोध करत होते, आता हा कायदा आणत आहेत. केवळ मुस्लिमांनाच मुलं होत नाहीत. तर हिंदूंनाही मुलं होतात. माझा या कायद्याला विरोध नाही. मात्र जनता या कायद्याला विरोध करत आहे. आमच्या मुलांचा तुम्ही एन्काऊंटर करता, मग आम्ही अशा कायद्यांना विरोध का करू नये?, असा सवालही त्यांनी केला.

ओवेसींकडे एवढा पैसा कुठून आला?

उत्तर प्रदेशात अलकायदा मॉडेल उघडकीस आलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एजन्सी काय करत असतात हे सर्वांना माहीत आहे. कुकर बॉम्ब निघाला आहे. ओवेसींची कोणतीच एजन्सी चौकशी करत नाही. त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Munawwar Rana says he will leave UP if Yogi re-elected as CM)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार?; नव्या समीकरणाच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात…

केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा

भाजपचं ठरलं! उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत लोकसंख्या नियंत्रण कायदा प्रचाराचा मुद्दा बनविणार!

(Munawwar Rana says he will leave UP if Yogi re-elected as CM)