AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच पवारांनी या भेटीवर खुलासा केला आहे. (Sharad Pawar)

केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 11:23 AM
Share

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच पवारांनी या भेटीवर खुलासा केला आहे. केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ( Sharad Pawar clarification after meeting PM Modi he said we dicussed issues of national interest)

ईडीने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्याआधी पवार आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची भेट झाली होती. त्यानंतर लगेचच मोदींबरोबर भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील बाहेर न आल्याने या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात होते.

पवार नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, शरद पवार यांनीच ट्विट करून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं एक पत्रंही पोस्ट केलं आहे. बँकिंग अधिनियमामधील दुरुस्तीबाबतचं हे पत्रं होतं. त्यामुळे या भेटीत बँकिंग अधिनियमावरही चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे.

पवारांचं पत्रं

बँकिंग दुरुस्ती विधेयकाचा उद्देश आणि तरतुदी आवश्यक आहे. मात्र, असं करताना संविधानात सहकाराबाबत निर्धारित करण्यात आलेल्या सिद्धांताला छेद तर देत नाही आहोत ना हे पाहिलं पाहिजे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने नव्याने सहकार खातं तयार केलं आहे. या खात्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी लिहिलेल्या या पत्राला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

म्हणून पवार भेटले

बँकिंग रेग्युलेटरी अॅक्टमध्ये बदल करण्यात आला असून तो सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली, अशी माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिली. बँकिंग रेग्युलेटरी कायद्यात नवीन बदल केल्याने जे लोक बँकांकडून कर्ज घेतील, त्यांना बँकेचे अडीच टक्के शेअर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कर्ज परत केल्यानंतर हे शेअर कुणालाही विकण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला देण्यात आला आहे असे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले आहेत. यापुर्वी हे शेअर बँकेलाच पुन्हा देण्याचा नियम होता. मात्र अशापद्धतीने खुल्या बाजारात शेअर विकल्यास सहकारी बँक धनाढ्य लोकांच्या हातात जाण्याची भीतीही, मलिक यांनी व्यक्त केली.

भाजपला मित्र पक्ष हवाय

शिवसेनेने भाजपची साथ सोडल्यानंतर महाराष्ट्रात भाजपकडे मित्र पक्ष उरलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील तीन पक्ष एकत्र आल्यास भाजपला मोठं नुकसाना सोसावं लागू शकतं. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला गळ घालण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. त्यामुळे पवार-मोदी भेटीकडे राजकीय अर्थाने पाहिले जात होते. ( Sharad Pawar clarification after meeting PM Modi he said we dicussed issues of national interest)

संबंधित बातम्या:

‘सहकार खातं दबावासाठी असेल तर हा महाराष्ट्र, इथं दबाव टाकून सत्ताबदल होत नाही’, पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा

सहकारी बँक राज्यांचा विषय सांगत पवारांनी मोदींचे कान टोचले, पत्रात घटनापीठाच्या ‘या’ निकालांचा उल्लेख

VIDEO: अखेर वेळा जुळल्या, राज ठाकरे-चंद्रकांतदादांची 15 मिनिटं खलबतं; चंद्रकांत पाटील म्हणतात…

( Sharad Pawar clarification after meeting PM Modi he said we dicussed issues of national interest)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.