माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांचा सन्मान, रिअल इस्टेट क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान

माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांचा सन्मान, रिअल इस्टेट क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान
डॉ. रामेश्वर राव, चेअरमन, माय होम ग्रुप

डॉ. रामेश्वर राव म्हणाले की, या सन्मानासाठी मी सर्वांचे आभार मानतो. विशेष करुन त्यांचे ज्यांनी या संपूर्ण यात्रेत त्यांची साथ दिली. तसंच निर्माण क्षेत्रात काम करत राहील. हैदराबादेत घरांची वाढती मागणी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 25, 2021 | 1:01 AM

नवी दिल्ली : माय होम ग्रुपचे (My Home Group) चेअरमन डॉ. जुपल्ली रामेश्वर राव (Dr. Rameshwar Rao) यांना तेलंगणमधील रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्राच्या विकासात केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेलंगणा क्रेडाई (CREDAI) मार्फत दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान टीएस कॉन्क्लेव्हचे प्रमुख पाहुणे राज्यपाल तमिलीसाई सैंदराराजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. रामेश्वर राव म्हणाले की, या सन्मानासाठी मी सर्वांचे आभार मानतो. विशेष करुन त्यांचे ज्यांनी या संपूर्ण यात्रेत त्यांची साथ दिली. तसंच निर्माण क्षेत्रात काम करत राहील. हैदराबादेत घरांची वाढती मागणी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबत रिअल इस्टेट क्षेत्राला बेकायदेशीर बांधकाम व्यावयासिकांपासून मुक्त ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

‘बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळता कामा नये’

‘माय होम ग्रुप पुढील वर्षी बांधकाम क्षेत्रात मोठं काम करणार आहे. हैदराबाद शहरात हाय राईज अपार्टमेंट्सना चांगली मागणी आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळता कामा नये. रिअल इस्टेट श्रेत्रात ही भूमिका महत्वाची असल्याचं सांगत ग्राहकांचा विश्वास राखा’, असंही राव यावेळी म्हणाले.

डॉ. राव यांनी यावेळी भगवान चिन्ना जियार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी प्रकल्पाही माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले की, 11 व्या शतकातील संत रामानुज यांना समर्पित असलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचे उद्घाटन करतील.

‘मेक लिव्हिंग बेटर’

डॉ. राव यांनी माय होम कन्स्ट्रक्शनची सुरुवात 1986 मध्ये मेक लिव्हिंग बेटर असं वचन देत केली होती. माय होम ग्रुपद्वारे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देण्यात आली. दिलेल्या वचनाची पूर्तता करत या ग्रुपने मागील 35 वर्षात 10 हजारापेक्षा अधिक कुटुंबांना गुणवत्तापूर्ण निवारा उपलब्ध करुन दिला आहे.

माय होम ग्रुपच्या संस्थापकांच्या संकल्पनेतून संस्थेसाठी एक मजबूत प्रणाली तयार करण्यात आली. त्याआधारे दर्जेदार बांधकाम, चांगली आणि विना अडथळा सेवा प्रदान केली. तसंच वेळेवर वितरणामुळे ग्राहकांच्या मनात एक विश्वास निर्माण केला. माय होम ग्रुप लक्झरी आणि पर्यावरणपूरक संरचना तयार करण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरते.

‘कंपनी फाईव्ह स्टार रेटिंग पुरस्काराने सन्मानित’

दिल्लीमध्ये मागील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय खनिज आणि संपत्ती कॉन्क्लेव्ह दरम्यान खाण आणि खनिज क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या कंपन्यांना फाईव्ह स्टार रेटिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माय होम ग्रुपचे रणजीत राव यांना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महत्वाची बाब माय होम हा ग्रुप भाडे तत्वावर देण्यात येणाऱ्या देशभरातील खाणींच्या व्यवस्थापनात उच्च दर्जाच्या मानकांचे पालन करणाऱ्या सर्वोच्च भारतीय कंपन्यांपैकी एक आहे.

इतर बातम्या :

देशात फेब्रुवारीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, वेळीच सावध व्हा! कानपूर IITचा इशारा

Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें