AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

My India My Life Goals: तर संपूर्ण भारत होईल हिरवागार, हरियाणाचे Tree Man यांचं देशवासियांना आवाहन

ट्री मॅन देवेंद्र सूरा: हरियाणा पोलिसात पोलीस कॉन्स्टेबल असलेले सुरा यांनी एक चळवळ सुरु केली आणि आज ते एक जनआंदोलन बनले आहे. त्यांच्यासोबत आज हजारो हात काम करत आहेत.

My India My Life Goals: तर संपूर्ण भारत होईल हिरवागार, हरियाणाचे Tree Man यांचं देशवासियांना आवाहन
| Updated on: Jun 27, 2023 | 4:41 PM
Share

Tree Man Devender Sura: आपण 5 जून रोजीच पर्यावरण दिवस का साजरा केला पाहिजे? प्रत्येक दिवशी आपण पर्यावरण दिवस साजरा का नाही करु शकतं? असा सवाल हरियाणाचे ट्री-मॅन देवेंद्र सूरा यांनी केला आहे. ही व्यक्ती असा प्रश्न करु शकते कारण ते गेल्या १० वर्षापासून हरियाणातील जमीन हिरवीगार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांचं मत आहे की, आपण दररोज पर्यावरण दिवस साजरा केला पाहिजे. यासाठी त्यांनी देशभरातील नागरिकांना आवाहन केले आहे.

हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल असलेले देवेंद्र सूरा म्हणतात की, आपण पशु-पक्षींमध्ये सोबत ही रमलो पाहिजे. मुळचे सोनीपतचे असलेले देवेंद्र सुरा हे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत आहेत. ते म्हणतात की, यासाठी शक्य तेवढा सायकलचा वापर केला पाहिजे. त्यांनी एकट्याने सुरु केलेल्या या चळवळीचे आता वटवृक्ष झाले आहे. यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ते म्हणतात की, त्यांना पर्यावरणाच्या अधिक जवळ यायचे आहे. ते म्हणतात की, भारत देश तेव्हाच हिरवागार आणि स्वच्छ होईल जेव्हा आपण दररोज पर्यावरण दिवस साजरा करु.

१५० हून अधिक गावात मोहिम

देवेंद्र सूरा यांनी सुरु केलेली ही चळवळ आता 150 हून अधिक गावांमध्ये पोहोचली आहे. त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांच्यामुळे आज हे एक लोकांची चळवळ बनली आहे. हरियाणाच्या 152 हून अधिक जिल्हा पंचायतींमध्ये त्यांच्यासोबत स्वयंसेवक काम करत आहेत.

कशी आली ही कल्पना

वृक्ष लावण्याबाबत त्यांच्या मनात तेव्हा आले जेव्हा ते चंडीगढमध्ये काम करत होते. त्यांनी आपल्या गावी गृहनगर सोनीपतला हिरवेगार करण्याचे ठरवले. सुरा यांनी सुरुवात आपल्या आजुबाजुच्या परिसरातून केली आणि त्यांनी आता १५० हून अधिक गावांमध्ये पोहोचली.

TV9 ही सहभागी

जगभरात ५ जून रोजी पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पर्यावरण दिन (World Environment Day) 1973 पासून साजरा केला जावू लागला. यावर्षी याला 50 वर्ष झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लाईफस्टाईल फॉर एनवायरमेंट मुव्हमेंटच्या अंतर्गत ‘माय इंडिया माय लाईफ गोल्स’ (My India My Life Goals) नावाचा उपक्रम भारत सरकारने सुरु केला आहे. पर्यावरणच्या रक्षणासाठी भारत सरकारच्या या मोहिमेत टीव्ही ९ देखील सहभागी आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.