आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलणार, मोठी घोषणा, काय आहे नवं नाव?
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जिल्ह्यांची नाव बदलण्यात आली आहेत. त्यामध्ये आता आणखी एका जिल्ह्याची भर पडणार आहे. आता आणखी एका जिल्ह्याचं नाब बदलण्यात येणार असून, मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शहरांची नाव बदलण्यात आली आहेत. जुन्या शहरांची नाव बदलून या शहरांचं नव्याने नामकरण करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात देखील अनेक शहरांची नाव बदलण्यात आली आहेत. ज्यामध्ये उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलं, उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्यात आलं, त्यानंतर अहमदनगरचं नाव देखील बदलण्यात आलं, अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आलं, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव देखील बदलण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या देखील काही प्रमुख शहरांची नाव बदलण्यात आली आहेत. जेव्हा -जेव्हा शहरांची नाव बदलण्यात येतात, तेव्हा -तेव्हा काही ठिकाणी वादाला तोंड फुटल्याचं देखील पहायला मिळालं, काही जणांनी शहराची नाव बदलण्यास विरोध केला, तर काही जणांनी शहरांची नाव बदलण्यास पाठिंबा दिला. दरम्यान आता आणखी एका शहराचं नाव बदलण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आता विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्याचं नाव आता बदलण्यात येणार आहे. भदोही जिल्ह्याचं नाव बदलून संत रविदास नगर भदोही असं या जिल्ह्याचं नामकरण करण्यात येणार आहे. भदोहीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. आता आपला भदोही जिल्हा हा संत रविदास नगर भदोही नावाने ओळखा जाईल असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या कार्यक्रमात 1,340 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन देखील योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलं.
या कार्यक्रमात पुढे बोलताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, संत रविदास नगर भदोहीचा विकास हा मिर्झापूर आणि वाराणसी सिल्क क्लस्टरच्या रुपात केला जाणार आहे. दरम्यान आता आणखी एका शहराचं नाव बदललं जाणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही घोषणा केली आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा देखील प्रारंभ झाला आहे.