नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?

| Updated on: Feb 09, 2021 | 11:32 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या प्रवाशांवर झालेल्या हल्ल्यावेळी प्रणव मुखर्जी आणि गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या कामाच्या आठवणीनं प्रणव मुखर्जी यांच्यासाठी भावूक झाले. Narendra Modi Pranab Mukherjee

नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?
नरेंद्र मोदी भावूक
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या आठवणीनं भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांना निरोप देण्यासाठी भाषण करत होते. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. (Narendra Modi emotional  in remembrance of Pranab Mukherjee)

गुलाम नबी आझादासंह चार खासदार निवृत्त

राज्यसभेतील गुलाम नबी आजाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी या सर्व जणांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्याचं काम केले. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान याचा देशाला फायदा झाला. या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आभारी आहे, असं मोदी म्हणाले.

गुलाम नबी आझाद ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमच्यामध्ये जवळचे संबंध होते. ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये 8 लोक मारले गेले. त्यावेळी पहिल्यांदा गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. त्यावेळी ते अश्रू रोखू शकले नव्हते. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुजरातच्या लोकांसाठी केलेले प्रयत्न विसरु शकत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केले, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

गुलाम नबी आझाद यांच्या नंतर जे त्यांचं पद सांभाळतील त्यांना गुलाम नबी आझाद यांनी त्या पदाला दिलेली उंची गाठण्यासाठी कष्ट करावे लागतील. गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या पक्षासोबत देशाची आणि राज्यसभेची काळजी असायची, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या:

शरद पवारांच्या वाढदिवसाला केकसाठी तुफान राडा, पोलिसांचा लाठीमार

शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार; आंदोलन पेटणार?

Narendra Modi emotional  in remembrance of Pranab Mukherjee