AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबरपासून सुरू, ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ मुख्य थीम

यंदाचा 9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. यंदाची मुख्य थीम ‘हमारी आंगनवाड़ी, हमारी जिम्मेदारी’ असणार आहे.

9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबरपासून सुरू, ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ मुख्य थीम
national nutrition monthImage Credit source: Google
| Updated on: Sep 08, 2026 | 8:14 PM
Share

नवी दिल्ली : कुपोषणाविरोधात जनजागृती आणि पोषणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी यंदाचा 9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रुद्राक्ष इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. यंदाची मुख्य थीम ‘हमारी आंगनवाड़ी, हमारी जिम्मेदारी’ असून, अंगणवाडी केंद्रांबाबत समाजाची सामूहिक जबाबदारी आणि सहभाग वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

राष्ट्रीय पोषण माह 2026 अंतर्गत आहारातील विविधता आणि पुरेसे प्रथिने, ताजे व पौष्टिक गरम शिजवलेले अन्न, समुदायाचा सहभाग, बालकांच्या पोषणासोबतच बौद्धिक विकास आणि मातृ आरोग्य या प्रमुख मुद्द्यांवर जनजागृती केली जाणार आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये पौष्टिक पदार्थांच्या पाककृतींचे प्रात्यक्षिक, पोषण मेळावे, प्रथिनयुक्त आहाराबाबत जनजागृती आणि भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

यंदाच्या पोषण माहमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) च्या दहाव्या वर्षानिमित्तही विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. पात्र गर्भवती आणि स्तनदा महिलांची 100 टक्के नोंदणी, योजनेच्या लाभांबाबत जनजागृती आणि थेट लाभ हस्तांतरणाला गती देण्यावर भर दिला जाणार आहे.

देशभरात 14 लाखांच्या जवळ अंगणवाडी केंद्रे

पोषण व्यवस्थेचा विस्तार लक्षात घेता देशभरात अंगणवाडी केंद्रांचे मोठे जाळे कार्यरत आहे. 31 जुलै 2026 पर्यंत देशात सुमारे 13.99 लाख अंगणवाडी केंद्रे आणि 13.30 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत असून, जवळपास 8.94 कोटी लाभार्थ्यांपर्यंत या यंत्रणेमार्फत विविध सेवा पोहोचत आहेत. यामध्ये 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 7.2 कोटींहून अधिक बालकांचा समावेश आहे. तसेच सुमारे 1.1 कोटी गर्भवती महिला आणि स्तनदा मातांपर्यंतही पोषणविषयक सेवा पोहोचत आहेत.

‘पोषण ट्रॅकर’मधून डिजिटल देखरेख

अंगणवाडी सेवांचे निरीक्षण आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर हे डिजिटल व्यासपीठ वापरले जात आहे. मार्च 2021 मध्ये सुरू झालेल्या या प्रणालीच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांची स्थिती, बालकांची उपस्थिती, पूर्वप्राथमिक शिक्षण उपक्रम आणि बालकांच्या वाढीचे निरीक्षण यासह विविध बाबींवर लक्ष ठेवले जाते.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?