NCP Hearing : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार; आज सर्वोच्च न्यायलयात काय झालं?

NCP and Shivsena Uddhav Thackeray Group Hearing in Supreme Court : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायलयात झालेल्या सुनावणीत पुढची तारीख देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय झालं? वाचा सविस्तरपणे...

NCP Hearing : राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार; आज सर्वोच्च न्यायलयात काय झालं?
Supreme Court
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2023 | 12:14 PM

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली | 09 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला म्हणजेच येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. जयंत पाटलांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तसंच ठाकरे गटाच्या याचिकेवरही शुक्रवारी सुनावणी पार पडेल. त्यामुळे आता  येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काय होतं? हे पाहणं महत्वाचं असेल.

ठाकरे गटाच्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला म्हणजेच येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

आज सर्वोच्च न्यायलयात काय झालं?

अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी या सुनावणीवर भाष्य केलं. शिवसेना आणि NCP आमदार प्रकरण क्लॅप केलं आहे. या याचिकांवर एकत्र यावर सुनावणी होईल. 13 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे. ती सुनावणी आधी पुढच्या महिन्यात गेली होती. पण ती सुनावणी आधीच होईल. आता सुनील प्रभू आणि जयंत पाटील या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी होईल. या दिवशी सर्वोच्च न्यायालय काहीतरी निर्देश 13 तारखेला देऊ शकतं. ठाकरे गटाच्या याचिकेवर तीन नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती 13 ऑक्टोबरला होणार आहे, अशी माहिती अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सुनावणीवर भाष्य केलंय. आमच्या अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडून पूर्ण होताना दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही याचिका एकत्रच होणार आहे. न्याय प्रक्रियेतून लढाई लढवी लागणार आहेत. न्यायालयानं सर्व मुद्दे गांभिर्यानं घेतले आहेत. आम्ही प्रकरण कधी फाईल केलं हे महत्त्वाचं नाही. तर कधी निकाल येईल हे पाहावं लागेल. या प्रकरणाचा निकाल महत्वाचा असेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.