AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : तर महाराष्ट्रातील टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा

अनेक वर्षापासून घाणेरडे रस्ते हाताला लागत आहे. टोलच्या आंदोलनावेळी शिवसेना-भाजपची युती होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. आता काय आहे. त्याचं काय मातेरं झालं हे कुणाला माहीत नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Raj Thackeray : तर महाराष्ट्रातील टोलनाके जाळून टाकू; राज ठाकरे यांचा राज्य सरकारला गंभीर इशारा
| Updated on: Oct 09, 2023 | 12:01 PM
Share

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : टोलच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे. फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून धांदात खोटं बोलत आहेत, असं सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही. टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाके जाळून टाकू असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दोन दिवसानंतर मी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याप्रमाणे आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि फोर व्हिलर, टू व्हिलरला कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही. आणि याला जर कुणी विरोध केला तर हे टोलनाके जाळू. पुढे काय सरकारला करायचे ते त्यांनी करावं, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

टोल हा सर्वात मोठा स्कॅम

देवेंद्र फडणवीस काल टोलबाबत जे म्हणाले ते खरं आहे का? याला धांदात खोटं असंच म्हणायचं ना? मग हे पैसे जातात कुठे? कुणाकडे जातात? खऱ्या अर्थाने पाहिलं तर टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. याची शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.

टोलचा पैसा जातो कुठे?

चार दिवसापूर्वी पाच ठिकाणी जी टोलवाढ झाली. त्याविरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सरकारने एक पत्र दिलं. त्यात कुणाला टोल आहे आणि कुणाला नाहीये याची माहिती होती. आमचं टोलचं आंदोलन 2009-10च्या सुमारास सुरू झालं. टोलचा सर्व कॅशचा पैसा जातो कुठे? त्याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना टोल मिळतात कसे? त्यानंतर शहरातील रस्त्यांवर खड्डे पडत असेल तर टोलचा पैसा जातो कुठे? सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे जातात कुठे?, असे सवाल राज ठाकरे यांनी केले.

Follow Us
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद