महिला शेतकरी म्हणाल्या, राहुल गांधींचं लग्न कधी करताय? सोनिया गांधी यांचं केवळ तीन शब्दांचं उत्तर

Sonia Gandhi on Rahul Gandhi Wedding : राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय पुन्हा चर्चेत; महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सोनिया गांधी यांचं तीन शब्दांचं उत्तर

महिला शेतकरी म्हणाल्या, राहुल गांधींचं लग्न कधी करताय? सोनिया गांधी यांचं केवळ तीन शब्दांचं उत्तर
| Updated on: Jul 29, 2023 | 2:10 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या 53 वर्षांचे आहेत. राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय वारंवार चर्चेत येतो. आताही पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. त्याचं झालं असं की काही शेतकरी महिलांना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जेवणासाठी घरी आमंत्रित केलं. तेव्हा या महिलांनी राहुल गांधी यांच्या लग्नाचा विषय छेडला.

राहुल गांधी काहीच दिवसांआधी हरयाणातील शेतात भाताची लागवड करताना दिसले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. सोनीपतमधल्या महिलांशीही त्यांनी बातचित केली.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या महिला शेतकऱ्यांना आमंत्रित केलं. तेव्हा या महिलांनी सोनिया गांधी यांना एक प्रश्न विचारला. राहुल गांधी यांचं लग्न करा, असं या शेतकरी महिला म्हणाल्याय त्यावर तुम्ही मुलगी शोधा ना, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

राहुल गांधी यांनी या प्रसंगाचा व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी आई, प्रियांका आणि माझ्यासाठी आजचा दिवस आठवणीत राहणारा आहे. या खास पाहुण्यांसोबत… सोनीपतच्या महिला शेतकरी भगिनी दिल्ली दर्शनासाठी आल्या. त्यांच्यासोबत घरी मस्त जेवण झालं आणि खूप साऱ्या गप्पा झाल्या, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

या भगिनींनी भेटायला येताना काही खास भेटवस्तू आणल्या होत्या. गावरान तूप, लस्सी, लोणचं आणि खूप-खूप प्रेम…, असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधी आणि त्याचं लग्न; कायम चर्चेचा विषय!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा कायमच होत असते. राहुल गांधी यांचं वय पाहता त्यांनी आता लग्न करावं, असं विरोधक वारंवार म्हणत असतात. RJD चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. 23 जूनला देशातील विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर लालूप्रसाद यादव, राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी लग्नाचा विषय काढत त्यांनी राहुल गांधींना चिमटा घेतला. आता तुम्ही लग्न करा, असं लालू प्रसाद यादव यावेळी म्हणाले होते.