AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSEAM प्रकरणी NCPCRची मोठी कारवाई; मेटा इंडियाच्या MD आणि प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स

बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराशी संबंधित सामग्रीच्या कथित जाहिरातींच्या प्रकरणी NCPCRने मेटा इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे.

CSEAM प्रकरणी NCPCRची मोठी कारवाई; मेटा इंडियाच्या MD आणि प्रमुख अधिकाऱ्यांना समन्स
Notice to Meta MDImage Credit source: Google
| Updated on: Sep 09, 2026 | 5:19 PM
Share

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराशी संबंधित सामग्रीच्या कथित जाहिरातींच्या प्रकरणाची राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आता NCPCRने मेटा इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि प्रमुख अधिकाऱ्यांना 9 सप्टेंबर रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराशी संबंधित सामग्री संदर्भातील कथित जाहिरातींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या मीडिया रिपोर्टची दखल घेत NCPCRने 3 जुलै 2026 रोजी स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत मेटा प्लॅटफॉर्म्स इंक.ला नोटीस बजावली होती.

या नोटिशीद्वारे आयोगाने मेटाकडून संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर मेटाने सुमारे आठवड्यानंतर आयोगाकडे आपले उत्तर सादर केले. मात्र, मेटाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही प्रकरणातील वस्तुस्थिती आणि संबंधित बाबी स्पष्ट करण्यासाठी NCPCRने या प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच चौकशीच्या पुढील टप्प्यात आयोगाने मेटा इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख अधिकाऱ्यांना 9 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सुनावणीदरम्यान आयोगाकडून संबंधित आरोप, मेटाने सादर केलेले स्पष्टीकरण तसेच प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या कथित जाहिराती कशा दिसून आल्या, यासंदर्भात माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात