PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया

PM Modi : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे.

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया
PM Modi
| Updated on: Jul 21, 2026 | 11:33 AM

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणात मोठं वक्तव्य केलं आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ देणार नाही. पेपर लीक प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती रिजिजू यांनी दिली. नीट पेपर लीक प्रकरणात पीएम मोदी शिक्षा आणि फुलप्रुफ सिस्टिमबद्दल बोलले. सरकार विद्यार्थ्यांबद्दल खूप संवेदनशील आहे, असं पीएम मोदी म्हणाले. नीट पेपर लीक प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली आहे. फेरपरीक्षा घेण्यात आली. निकालाला विलंब झाला नाही. पुढे पेपर लीक होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलण्यात येतील.

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. हा फक्त एका राज्याचा नाही, संपूर्ण देशाचा विषय आहे. या विषयात पक्षीय राजकारण होऊ नये. त्याशिवाय फ्री-ट्रेड एग्रीमेंटवर चर्चा झाली. शेतकरी हिताला प्राधान्य दिलं जाईल असं पीएम मोदी म्हणाले. कुठलही नुकसान होऊ देणार नाही. पीएम मोदींनी मार्गदर्शन केलं असं रिजीजू म्हणाले. देशाने मागच्या महिन्यात जे यश मिळवलय, त्याचा उल्लेख मोदींनी केला.

पोलिसांबरोबर आंदोलकांची झडप झाली

नीट पेपर लीक प्रकरणात एक महिन्यापासून जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं प्रदर्शन सुरु आहे. त्याचं नेतृत्व कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके करत आहे. विद्यार्थ्यांना विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.
कालपासून राजधानी दिल्लीतलं वातावरण तापलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. काल संसदेवर CJP ने मोर्चा काढलेला. यावेळी हिंसाचार झाला.

118 पोलीस जखमी

पोलिसांबरोबर आंदोलकांची झडप झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. 78 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जवळपास 118 पोलीस जखमी झाले. आंदोलकही जखमी झाले. संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना 150 मीटर अंतरावर रोखलं. आंदोलक आक्रमक झालेले. पोलिसांनी लावलेली बॅरिकेडींगही या आंदोलकांनी तोडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us