AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest: दिल्लीत हिंसक आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांचा संसदेबाहेर पडतानाच तो व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप, घडलं काय?

CJP Protest-Dharmendra Pradhan: काल दिल्लीत कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाले. जंतर मंतर परिसरात या घडामोड घडत असताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा संसदेबाहेर पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

CJP Protest: दिल्लीत हिंसक आंदोलन; धर्मेंद्र प्रधान यांचा संसदेबाहेर पडतानाच तो व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप, घडलं काय?
धर्मेंद्र प्रधान, सीजेपी
| Updated on: Jul 21, 2026 | 11:19 AM
Share

CJP Protest-Dharmendra Pradhan: काल दिल्लीत जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संसदेकडे कूच करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला. आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. एकच गोंधळ उडाला. या हिंसक घटनेत 118 पोलीस तर 150 आंदोलक जखमी झाल्याचे समोर आले आहे. आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करत असताना इकडे संसदेकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते हसत हसत संसदेबाहेर पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे.

हसत हसत संसदेबाहेर

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे संसदेबाहेर पडत होते. दिल्लीत आंदोलन पेटलेले असताना ते हसताना दिसले. संसदेबाहेर पडतानाचा त्यांचा हा व्हिडिओ माध्यमांनी कैद केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी शिक्षणमंत्र्यांच्या कृतीवर टीकास्त्र सोडले आहे. आंदोलन पेटलेले असतानाही, तरुण-तरुणींवर लाठीहल्ला झाला असतानाही शिक्षण मंत्र्यांना त्याच्याशी काहीच सोयरसुतक नसल्याची टीका सोशल मीडियातून होताना दिसत आहेत.

आंदोलनावर अभिजीत दिपके ठाम

काँक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. दिल्ली पोलीस हे गुंड असल्याचा आरोप केला. 12-14 वर्षांच्या मुलींवर अमानुष लाठीहल्ला झाल्याचा आरोप केला. तर एका आंदोलनकर्तीची तब्येत अत्यंत गंभीर असल्याचा दावा दिपके यांनी केला. त्यांनी या सर्व हिंसेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला. ट्रकभरून दगड कोठून आणले, कोणी आणले असा आरोप करत त्यांनी यासाठी पोलिसांनाच जबाबदार ठरवले. तर सरकार मला एकटं पाडण्याच्या तयारीत होते. त्यासाठी जे. पी. नड्डा यांच्या घरी वेळकाढू चर्चा करण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला.

तर ताज्या अपडेटनुसार, NDA च्या बैठकीतही दिल्लीतील आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आणि सीजीपीविषयी चर्चा झाल्याचे समजते. तर INDIA आघाडीची बैठक होत असून त्यातही या आंदोलनावर चर्चा होणार असल्याचे समजते. पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा ऐरणीवर असल्याचे दिसते. तर केंद्र सरकारने त्यांचा अजेंडा रेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार महत्त्वाची विधेयकं मांडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप या सर्व प्रकारावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण त्यांच्या या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका करण्यात येत आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली