AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि अमेरिकेत मोठी भागीदारी, थेट 50 टक्के देशात येणारा एलपीजी गॅस अमेरिकेतून, सिलेंडरमध्ये..

रशियाच्या तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारतावर अनेक गंभीर आरोप करण्यात आली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठे निर्बंध अमेरिकेने लादले. आता तीच अमेरिका भारताला एलपीजीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करत आहे.

भारत आणि अमेरिकेत मोठी भागीदारी, थेट 50 टक्के देशात येणारा एलपीजी गॅस अमेरिकेतून, सिलेंडरमध्ये..
LPG gas USA
| Updated on: Sep 08, 2026 | 7:17 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले होते. त्यातच पुन्हा अमेरिकेकडून इराणवर हल्ले केली जात आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला की, त्याचे परिणाम जागतिक बाजारावर बघायला मिळतात. थेट कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडतो. या युद्धादरम्यान इराणकडून होर्मुज खाडी बंद ठेवण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतासह अन्य देशात कच्च्या तेलाची मोठी समस्या बघायला मिळाली. टंचाई निर्माण झाली होती. फेब्रुवारी महिन्यापासून भारत एलपीजीशी (LPG) संबंधित आव्हानांचा सामना करत आहे. भारतात एलपीजीची मोठी समस्या आहे. भारत एलपीजी गॅस इतर देशांकडून आयात करतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या नाकेबंदीवरून इराण आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे या भागातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. भारताला फटका बसतोय.

भारताने एलपीजीची समस्या टाळण्यासाठी अमेरिकेकडून एलपीजी आयात करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात अमेरिका ही भारताला एलपीजीचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश ठरला आहे. भारताने सर्वात जास्त ऑगस्ट महिन्यात अमेरिकेकडून एलपीजी गॅस खरेदी केली. कतार हा भारताला सर्वात जास्त एलपीजी पुरवठा करणारा देश आहे, पण आता त्याची जागा अमेरिकेने घेतली.

अमेरिकेसोबतच्या युद्धात कतारच्या गॅस प्रकल्पांवर हल्ला इराणने केला, ज्यात मोठे नुकसान झाले. आखाती देशांकडून होणाऱ्या एलपीजी पुरवठ्यात मोठी वाढ झाली. केप्लर आणि पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल यांनी दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. केप्लरच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये भारताच्या एकूण एलपीजी आयातीत 14.5 टक्क्यांनी वाढ झाली.

या काळात आखाती देशांतून येणाऱ्या एलपीजीचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले. भारताच्या एकूण एलपीजी आयातीत आखाती देशांचा वाटा जुलैमधील 16.4 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 29.7 टक्क्यांपर्यंत वाढला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव भारतावर होता. त्यातच भारताबद्दल विविध विधानेही करण्यात आली.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात