Eknath Shinde vs Shiv Sena : …म्हणून थेट सुप्रीम कोर्टात आलो, शिंदे गटाच्या नीरज कौल यांनी काय युक्तीवाद केला?

| Updated on: Aug 03, 2022 | 1:43 PM

युक्तीवाद करताना नीरज कौल म्हणाले, की अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोगाकडे जाण्यात काहीही गैर नाही. घटनात्मक यंत्रणांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. असेही नीरज कौल म्हणाले आहेत.

Eknath Shinde vs Shiv Sena : ...म्हणून थेट सुप्रीम कोर्टात आलो, शिंदे गटाच्या नीरज कौल यांनी काय युक्तीवाद केला?
supreme court on Eknath shinde vs shiv sena Live
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : धमकीचा गंभीर मुद्दा होता. हेच आम्ही इथे येण्याचे कारण आहे. आम्हाला धोका वाटत होता, म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात आलो, असा युक्तीवाद शिंदे गटातर्फे वकील नीरज कौल (Adv. Neeraj Kaul) यांनी केला आहे. तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात का आलात असा सवाल न्यायालयाने नीरज कौल यांना केला होता. यावर नीरज कौल यांनी हे उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना यांच्यातील वाद सध्या सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्यावरच्या सुनावणीदरम्यान हा युक्तीवाद करण्यात आला आहे. शिवसेनेतर्फे (Shivsena) कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीष साळवे, महेश जेठमलानी बाजू मांडत आहेत. या वादावर महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाचा बचाव करताना आता अध्यक्षांनाच निर्णय घेऊ द्या, असे म्हटले आहे. दरम्यान, याविषयीचा निर्णय उद्या होणार आहे.

‘निवडणूक आयोगाकडे जाण्यात काहीही गैर नाही’

युक्तीवाद करताना नीरज कौल म्हणाले, की अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोगाकडे जाण्यात काहीही गैर नाही. घटनात्मक यंत्रणांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. असेही नीरज कौल म्हणाले आहेत. शिंदे गटातर्फे यावेळी महेश जेठमलानी यांनीही जोरदार युक्तीवाद केला. मुख्यमंत्री बहुमत नाकारत असतील तर ते अल्पमतात जातात. सभागृहाता निर्णय न्यायालयीन कक्षेत येत नाही. नव्या सरकारने बहुमताच्या जोरावर नवा अध्यक्ष निवडला. ठाकरे सरकारने एक वर्ष अध्यक्ष निवडला नाही. त्यामुळे आता नवे अध्यक्ष ठरवतील, असे जेठमलानी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तीवाद

मुख्यमंत्री बदलाची मागणी ही पक्षविरोधी ठरवता येणार नाही. मुख्यमंत्री भेटत नसल्याने शिंदे गटाकडून मुख्यमंत्री बदलाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही, असा युक्तीवाद हरीष साळवे यांनी केला. दरम्यान, शिंदे गटच खरा पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करून सगळी प्रक्रिया ही कायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला आहे, यावर शिवसेनेतर्फे अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद करत निलंबन टाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.