एकतर्फी ‘मन की बात’ नको – पंतप्रधानांच्या रात्रीच्या संबोधनानंतर मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
नीट पेपरफुटीमुळे देशभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत केलेल्या व्हिडीओ संदेशावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली आहे. संसदेत चर्चा करण्याऐवजी एकतर्फी 'मन की बात' नको, असे म्हणत खर्गे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संसदेत चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नीट पेपर फुटीच्या मुद्यावरून देशभरात महिन्याभरापासून आंदोलन सरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशीरा याच मुद्यावरून भाष्य करत विद्यार्थ्यांना संबोधित केलं. तसेच सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारेही त्यांनी मेसेज दिला. मात्र पंतप्रधानांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी या विषयावर बोलले. तर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेत येण्यापूर्वी प्रधानांची हकालपट्टी करावी अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. रात्री उशीरा एकतर्फी ‘मन की बात’ करायची नसते अशा शब्दांत खर्गे यांनी टीका केली.
संसद सुरू असताना मोदींनी संसदेत बोलायचं असतं. लाठीचार्ज करायला लावला, त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणू खर्गे यांनी केली. विद्यार्थ्यांची माफी मागा आणि मग आम्ही चर्चा करू, अशी अटच खर्गे यांनी घातली आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल रात्री उशीरा एक व्हिडीओ ट्विट केला होता, त्यावरून आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही X वर पोस्ट करत टीकास्त्र सोडलं.
काय आहे खर्गे यांचं ट्विट ?
संसदेचं अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी संसदेच्या सभागृहात निवेदन द्यायला हवं, रात्री उशिरा व्हिडिओ रेकॉर्ड करून संसदेबाहेर एकतर्फी “मन की बात” करू नये!!
@narendramodi जी,
आज संसदेत येण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवून या. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची माफी मागा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी लाठीचार्ज, काठ्यांचा वापर आणि पेलेट गन वापरण्याचे आदेश देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
त्यानंतर आम्ही शिक्षण व्यवस्थेवर सविस्तर चर्चेसाठी पूर्णपणे तयार आहोत – असं खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
जब संसद चल रही होती है तो प्रधानमंत्री को संसद के पटल पर Statement देना होता है, देर रात एक वीडियो बनाकर, संसद के बाहर एकतरफ़ा “मन की बात” नहीं करनी होती !! @narendramodi जी,
आज संसद में आने से पहले, धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त कर के आइएगा। पहले छात्रों से माफ़ी माँगिए और…
— Mallikarjun Kharge (@kharge) July 24, 2026
राहुल गांधी यांनीही केली प्रधानांच्या हकालपट्टीची मागणी
यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनींही मोदींच्या कालच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली होती. ‘आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत’ असं राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या व्हिडिओ संदेशावर म्हटलं. “या अर्ध्यारात्रीच्या व्हिडिओवरुन त्यांच्या इंटेलिजेंसचा अपमान करु नका. प्रधान यांना बर्खास्त करा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्या आणि माफी मागा” अशी मागणीच राहुल गांधी यांनी केली.
