नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलन प्रकरणी मोठी कारवाई; थेट राजकीय पक्षाच्या प्रमुखाला अटक

नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली. बिहार पोलिसांनी तेज प्रताप यादव यांना अटक केली.

नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलन प्रकरणी मोठी कारवाई; थेट राजकीय पक्षाच्या प्रमुखाला अटक
| Updated on: Jul 26, 2026 | 11:34 AM

बिहारमध्ये नीट पेपरफुटीविरोधात शनिवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बिहारच्या विविध भागात आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. ‘बिहार बंद’ची घोषणा केल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. पटनाच्या राम चौकात आंदोलनात माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव सहभागी झाले होते. ते आंदोलनात सहभागी झाल्यानंतर काही वेळातच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी म्हटलं की, ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. गरज पडल्यास विद्यार्थ्यांच्या अधिकारासाठी जीव द्यायला देखील तयार आहे’.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेज प्रताप यादव यांनी बिहारमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याशिवाय आंदोलनात त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती.  परंतु तेज प्रताप यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पटनामध्ये रस्त्यावर पोलिसांवर दगडफेक

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बिहारमधील विविध जिल्ह्यातील डाव्या संघटनांचे सदस्य शनिवारी नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. तर पोलिसांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये आंदोलनाला समीश्र प्रतिसाद मिळाला. पटनामध्ये दगडफेक झाली. तर काहींनी पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केलं.

तेजप्रताप यादव यांनी नेमकं काय आवाहन केलं होतं?

माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी अभिजीत दीपके यांना आवाहन केलं होतं की, बिहारमधील सम्राट चौधरी यांचं भाजप सरकार पाडण्यास मदत करा’. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तत्पूर्वी, लाल प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली होती. तेजप्रताप यांनी हे आवाहन सोशल मीडियातून केलं होतं. त्यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्याच दिवशी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us