AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Exam : नीट परीक्षा रद्द होताच NTA चा मोठा निर्णय, विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात मोठी अपडेट

NTA on NEET Exam : नीट परीक्षेत पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द झाली आहे. त्यानंतर आता NTA ने एक पत्रक जारी करत विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.

NEET Exam : नीट परीक्षा रद्द होताच NTA चा मोठा निर्णय, विद्यार्थी-पालकांसाठी सर्वात मोठी अपडेट
Dharmendra Pradhan NTAImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 12, 2026 | 7:09 PM
Share

नीट परीक्षेत पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 10 मे 2026 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाच्या पुढील भाग प्रसिद्ध केला आहे. यात विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना NEET (UG) 2026 संदर्भात घेण्यात आलेल्या पुढील निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. आता नवीन पत्रकात NTA ने काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

NEET (UG) 2026 परीक्षा रद्द

केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधून NTA ने तपासलेल्या माहितीनुसार तसेच कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी शेअर केलेल्या निष्कर्षांच्या आधारे, आणि परीक्षापद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी, भारत सरकारच्या मंजुरीनंतर NTA ने 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार असून त्याच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत. NTA ला प्राप्त झालेली माहिती आणि तपास यंत्रणांचे निष्कर्ष पाहता सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुनर्परीक्षेच्या तारखा तसेच नव्याने प्रवेशपत्र जारी करण्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जारी केले जाणार आहे.

CBI चौकशीचा निर्णय

भारत सरकारने या प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. NTA या चौकशीस पूर्ण सहकार्य करेल आणि आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी व मदत उपलब्ध करून देणार आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय

राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास होईल याची NTA ला जाणीव आहे आणि या परिणामाकडे संस्था हलक्यात पाहत नाही. मात्र, परीक्षा कायम ठेवल्यास या विश्वासाला अधिक गंभीर आणि दीर्घकालीन धक्का बसला असता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

नव्याने नोंदणीची गरज नाही

मे 2026 सत्रातील नोंदणी माहिती, उमेदवारी आणि निवडलेली परीक्षा केंद्रे पुनर्परीक्षेसाठी कायम ठेवली जातील. विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत केली जाईल आणि पुनर्परीक्षा NTA च्या अंतर्गत संसाधनांद्वारे घेतली जाईल.

अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या

NEET पुनर्परीक्षेच्या तारखा आणि नव्याने प्रवेशपत्र जारी करण्याचे वेळापत्रक यासह पुढील सर्व माहिती NTA च्या अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी आणि पालकांनी केवळ अधिकृत माहितींवर विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?