AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाच्या प्री वेडिंग नीता अंबानी यांचा कल्चरल डान्स, सर्वांची मने जिंकणार VIDEO व्हायरल

Anant-Radhika Pre-Wedding Celebrations | दिलजीत दोसांझ याच्या गाण्याने समारंभात धूम मचाली. त्याने स्टेजवर भांगडा केला. तसेच दिलजीत दोसांझ याने करीना कपूर-सैफ अली आणि करिश्मा कपूर सोबत डान्स केला. नीता अंबानी यांनी पारंपारीक नृत्य केले.

मुलाच्या प्री वेडिंग नीता अंबानी यांचा कल्चरल डान्स, सर्वांची मने जिंकणार VIDEO व्हायरल
| Updated on: Mar 04, 2024 | 8:32 AM
Share

जामनगर | दि. 4 मार्च 2024 : गेल्या तीन दिवसांपासून एक प्री वेडिंगची चर्चा सुरु होती. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत यांच्या प्री वेडिंग समारंभ जामनगरमध्ये थाटात झाला. तीन दिवस चालणाऱ्या या समारंभात देश-विदेशातून दिग्गज आले होते. या समारंभासाठी प्रथमच जामनगरमध्ये १६० आंतरराष्ट्रीय विमानांमधून विदेशी पाहुणे आले होते. अन्यथा जामनगर विमानतळावर दिवसातून पाच ते दहा विमाने उडत होती. दरम्यान या समारंभाचे सर्वात महत्वाचे आकर्षण नीता अंबानी यांचा डान्स परफार्मन्स राहिला. त्यांच्या पारंपारिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्या नृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नीता अंबानी यांनी कोणते नृत्य केले

“या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” या मंत्राने नीता अंबानी यांच्या नृत्याची सुरुवात झाली. त्यानंतर “विश्वंभरी अखिल विश्व तनी जनेता विद्या धरी वदनमा वसजो विधाता” या भजनावर पारंपारीक भारतीय नृत्य त्यांनी केले. या समारंभाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. परंतु नीता अंबानी यांच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. काही तासांत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

काय विचारतात दिलजीतला नीता अंबानी

गायक दिलजीत दोसांझ यांचा नीता अंबानी यांनी गुजराती भाषेतून क्लास घेतला. नीता अंबानी सिंगर दिलजीत दोसांझ यांना विचारते,’केम चो’, तो दिलजीतने उत्तर दिले ‘माजा मां’ त्यावर प्रेक्षक चांगलेच खूश होतात. त्यानंतर पुन्हा एक प्रश्न नीता अंबानी विचारतात. पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ यांना तो प्रश्न कळत नाही. ते सरळ मला प्रश्नाचा अर्थ समजला नाही. पुन्हा प्रश्न विचारला. हिंदीतून नीता अंबानी विचारतात, कुठे राहतात. तेव्हा दिलजीत म्हणतो, लोकांच्या ह्रदयात…त्याच्या उत्तरावर जोरदार टाळ्या पडतात.

दिलजीत दोसांझ याच्या गाण्याने समारंभात धूम मचाली. त्याने स्टेजवर भांगडा केला. तसेच दिलजीत दोसांझ याने करीना कपूर-सैफ अली आणि करिश्मा कपूर सोबत डान्स केला.

हे ही वाचा

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगला जगभरातून दिग्गज, बॉलिवूड सिलेब्रटीज, अब्जाधिश होणार सहभागी

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.