AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न डोळे, न कान, तरीही टॉपर!,सारा मोईन हीने अंपगत्वावर मात करीत 12 वीत मिळवले 98.75%

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे राहणाऱ्या सारा मोईल हीने ISC बारावी बोर्डाच्या परीक्षेत 98.75 मिळवून तिच्या ख्राईस्ट चर्च कॉलेजमधून पहिला नंबर पटकावला आहे.

न डोळे, न कान, तरीही टॉपर!,सारा मोईन हीने अंपगत्वावर मात करीत 12 वीत मिळवले 98.75%
Sara Moeen
| Updated on: May 04, 2026 | 7:49 PM
Share

नुकतेच बारावीचे निकाल लागले. या परिक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. मात्र, लखनऊ येथील १९ वर्षीय सारा मोईन या दिव्यांग विद्यार्थीनीने जे यश मिळवले त्याला तोड नाही. सारा मोईन हीला नीट दिसत नाही आणि ऐकायला देखील येत नाही. एवढेच काय तिला बोलताना देखील त्रास होतो. या अडचणींवर मात करुन सारा हीने ISC च्या १२ वीच्या परीक्षेत ९८.७५ टक्के मिळवून लखनऊच्या ख्राईस्ट चर्च कॉलेजमधून टॉप केले आहे. २५८ विद्यार्थ्यांमध्ये सर्वात गुण मिळवून सारा हीने सिद्ध केलेय की जर इच्छा असेल तर कोणीही तुमचा मार्ग अडवू शकत नाही.

सारा जेव्हा केवळ चार वर्षांची होती तेव्हा तिला सारकॉयडोसिस नावाची दुर्मिळ आजार झाला. ज्यामुळे हळूहळू तिची दृष्टी अधू झाली. काही वर्षांनी तिची श्रवण शक्ती देखील नष्ट झाली. बोलताना तिला अडचण होत होती. मात्र, या आव्हानावर मात करत तिने हार मानली नाही. तिचे वडील मोइन अहमद यांनी मुलीच्या शिक्षणासाठी नोकरी सोडली.आणि तिला ते शाळेत घेऊन जाऊ लागले. ख्राईस्ट चर्च कॉलेजने देखील सारा हिच्यासाठी विशेष व्यवस्था केली. या शाळेत विशेष गरज असलेल्या मुलांसाठी वेगळे सेक्शन असून तेथे प्रशिक्षित शिक्षक त्यांना शिकवतात.

अभ्यासासाठी खास उपकरण

सारा हीला अभ्यासासाठी ऑर्बिट रीडर सारख्या ब्रेल उपकरणाचा वापर केला जातो. पुस्तकांना स्कॅन करुन डिजिटल फॉर्मेटमध्ये बदलले गेले. त्यामुळे अंध मुलांना अभ्यास करता येतो. परीक्षेत देखील ब्रेल लिपीत प्रश्न पत्रिका दिली जाते. सारा हीने मिळवलेले यश हे तिचा संघर्ष, कुटुंबाचा त्याग आणि शिक्षकांची मेहनतची परिणाम आहे. तिचे शिक्षक तिला प्रेमाने हेलेन केलर म्हणतात.

प्रिंसिपल काय म्हणाले ?

सारा हीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल प्रिन्सिपल यांनी सांगितले की सारा हीच्या यशाचा संस्थेला अभिमान आहे. साराने दाखवून दिले की मर्यादा शरीराला असतात,स्वप्नांना नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी