AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल यांच्याकडून इन्कलाब जिंदाबादचा नारा; म्हणाले, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी…

Delhi CM Arvind Kejriwal on PM Narendra Modi Loksabha Election 2024 : अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळताच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधला. केजरीवाल काय म्हणाले? वाचा सविस्तर...

अरविंद केजरीवाल यांच्याकडून इन्कलाब जिंदाबादचा नारा; म्हणाले, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी...
| Updated on: May 11, 2024 | 2:11 PM
Share

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांना अंतिरिम जामीन मंजूर केला आहे. 1 जूनपर्यंत केजरीवाल जामीनावर असणार आहेत. काल जामीन मिळाल्यानंतर आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. भारत माता की जय… इन्कलाब जिंदाबादचा नारा देत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. आपल्या पक्षावर आणि देशावर बजरंगबलीची कृपा आहे. आमचा पक्ष लहान आहे . दहा वर्षांचा आहे. पण आमच्या पक्षाला संपवण्यासाठी पंतप्रधानांनी सगळे मार्ग वापरले. चार नेत्यांना जेलमध्ये पाठवल्यावर यांना वाटलं पक्ष संपेल. पण आमचा पक्ष म्हणजे विचार आहे… असं म्हणत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो… आता मी देशभर फिरणार आहे. माझं तर मन धन देशासाठी कुरबान आहे… माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पण करणार आहे. माझ्या शरिरातील रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी मी देणार आहे. दिवसात 24 तास असतात. पण मी मी 36 तास काम करेन, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

नरेंद्र मोदींना प्रतिप्रश्न

नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला विचारतात की तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? पण मी त्यांना विचारतो, तुमच्याकडे कोण आहे? भाजपमध्ये 75 वर्षानंतर निवृत्ती घेतली आहे… लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना निवृत्त केलं. पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी निवृत्त होत आहेत. मग भाजपला मी विचारतो प्रधानमंत्री पदाचा दावेदार कोण आहे? जर यांच सरकार आलं तर योगीना डावलून अमित शाह यांना पंतप्रधान केलं जाईल.अमित शाह मोदींची गॅरंटी पूर्ण करणार का?, असं सवाल केजरीवाल यांनी केला आहे.

देशात आघाडी सरकार येणार- केजरीवाल

तुरुंगातून बाहेर आल्यावर गेल्या 20 तासात मी देशभरातल्या अनेक लोकांशी बोललोय त्यावरून असा अंदाज येतो की 4 जून नंतर भाजपचं सरकार बनणार नाही. सगळ्या राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. याच्या 220 जागा येऊ शकतात. त्यामुळे केंद्रात यंदा इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. आप पक्ष केंद्रातील सरकारमधील घटक असेल, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.