दिल्ली इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, शेवटच्या 10 सेकंदात काय घडलं? CCTV व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये शनिवारी पहाटे एका बहुमजली इमारतीचा कोलमडून पडल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारत कोसळण्याचे भयानक दृश्ये दिसून येत आहेत.

दिल्लीतील न्यू मुस्तफाबादमध्ये परिसरात शनिवारी पहाटे एक बहुमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात एका नवीन दुकानाचे बांधकाम सुरू होते. ते सुरु असताना अचानक शनिवारी पहाटे ही इमारत कोसळली. सलीम अली नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीच्या भिंतींमध्ये जवळच्या घाणेरड्या गटारांचे पाणी शिरत होते. यामुळे इमारतीची रचना कमजोर झाली होती. इमारतीत सर्वत्र भिंतींना भेगा पडल्या होत्या. फक्त हीच इमारत नव्हे तर आजूबाजूला असलेल्या 4 ते 5 इमारतींची अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अनेक लोक आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शोधण्यासाठी धावपळ करत आहेत. या दुर्घटनेतील मृतांचा आणि जखमींची नावे समोर आली आहेत. दिल्ली महानगरपालिका जारी केलेल्या निवेदनानुसार, ही इमारत सुमारे २० वर्षे जुनी होती. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याबद्दल अधिकृत तपास सुरू आहे.
दिल्ली दुर्घटनेतील मृतांची नावे
- चांदनी पत्नी चांद (23F)
- दानिश पुत्र शाहिद (23M)
- नावेद पुत्र शाहिद(17M)
- रेशमा पत्नी अहमद (38F)
- अनस पुत्र नजीम (6M)
- नजीम पुत्र तहसीन (30M)
- तहसीन (60M)
- शाहिना पत्नी नजीम (28F)
- आफरीन पुत्र नजीम (4F)
- अफान पुत्र नजीम (2M)
- इशाक (75M)
डिस्चार्ज दिलेल्या व्यक्तींची नावे
- चांद पुत्र तहसीन (25)
- शान पुत्र चांद (4)
- सान्या पुत्री चांद (2)
- नेहा पुत्री शाहिद (19)
- अल्फेज पुत्र अहमद (20)
- आलिया पुत्री अहमद (17)
या जखमींवर उपचार सुरु
- अहमद पुत्र बल्लू (45)
- तनु पुत्री अहमद, (15F)
- जीनत पत्नी तहसीन (58F)
- शाहिद पुत्र साबिर (45)
- रेहाना पत्नी शाहिद (38)
#WATCH | Delhi: Mustafabad building collapse caught on camera.
As per Delhi Police, “Among the 10 people who were taken out, 4 succumbed. Rescue operations still underway”
(Source – local resident) https://t.co/lXyDvOpZ3q pic.twitter.com/NlknYWODRR
— ANI (@ANI) April 19, 2025
सीसीटीव्ही व्हिडीओत नेमकं काय?
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये परिसरात शनिवारी पहाटे २.३९ मिनिटांनी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. सुरुवातीला इमारतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर काही सेकंदातच संपूर्ण इमारत कोसळली. यानंतर इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आणि धुळीचे साम्राज्य पसरले होते. या दुर्घटनेमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. सध्या एनडीआरएफचे जवान, दिल्ली अग्निशमन दलाकडून वेगाने बचावकार्य सुरु आहे.