G-20 Summit 2023 : जो बायडन- मोदी भेटीचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या खिशावर; ‘या’ गोष्टी होणार स्वस्त

PM Narendra Modi And US President Joe Biden Meeting : भारतात पोहोचताच जो बायडन यांच्या 'या' कृतीने अवघ्या देशाचं लक्ष वेधलं; जगाला दाखवून दिले भारत आणि अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध, वाचा दोन राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत नेमकं काय घडलं...

G-20 Summit 2023 : जो बायडन- मोदी भेटीचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या खिशावर; या गोष्टी होणार स्वस्त
| Updated on: Sep 09, 2023 | 10:46 AM

G20 New Delhi Summit 2023 : G20 परिषदेची आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील काल संध्याकाळी भारतात दाखल झाले. भारत अर्थात राजधानी दिल्लीत बायडन दाखल झाले, तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. हे स्वागत स्विकारल्यानंतर जो बायडन हे हॉटेलवर न जाता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्गवरील पंतप्रधानांच्या घरी पोहोचले. इथे पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळई बायडन आणि मोदी यांच्यात जवळपास दीडतास दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन बड्या देशांच्या प्रमुखांच्या या भेटीचा थेट तुमच्या-आमच्या खिशावर परिणाम होणार आहे.

रिन्यूएबल एनर्जीवर या भेटीत चर्चा झाली. भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये रिन्यूएबल इंफ्रास्ट्रक्चर इंवेस्टमेंट फंड तयार करण्यावर या भेटीत चर्चा झाली.
1 अरब डॉलर म्हणजे जवळपास 8 हजार 300 कोटी रुपयांची ही गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक दोन्ही देशांकडून 50-50 % असेल. म्हणजेच भारत 50 कोटी डॉलरची गुंतवणून भारत करेल.

तुमच्या माझ्या जगण्यावर काय परिणाम होणार?

रिन्यूएबल इंफ्रास्ट्रक्चर इंवेस्टमेंट फंड, बॅटरी स्टोरेज आणि ग्रीन टेक्नोलॉजी या गोष्टींना या करारामुळे प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे आपल्यासाठी दररोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतींवर याचा परिणाम होणार आहे. सोलर पॅनेल, बॅटरी इंफ्रास्ट्रक्चर सारख्या वस्तूंच्या किमती कमी होतील. या शिवाय येत्या काळात इलेक्ट्रिक गाड्या आणि वीजेच्या दरातही घट होईल. न्यूक्लियर एनर्जीला या भेटीत प्रोत्साहन दिलं गेलं. यात नव्या टेक्नॉलॉजीला अधिक विकसित केलं पाहिजे, अशीही चर्चा झाली. रीन्यूएबल टेक्नोलॉजी आणि एनर्जी सिस्टमसाठी कौशल्या विकसित केली पाहिजेत, अशी चर्चा झाली.

‘या’ कृतीने जगाचं लक्ष वेधलं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे काल दिल्लीत दाखल झाले तसं त्यांनी लोक कल्याण मार्गवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे G-20 परिषदेआधी थेट मोदींची अशी भेट जगाला भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना दर्शवतं. जवळपास दीडतास चाललेल्या या भेटीतून यातून बायडन यांनी दाखवू दिलं की, भारत आणि अमेरिकेचं संबंध मैत्रिपूर्ण आहेत.