AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fastag : ‘फास्टॅग’ हद्दपार, टोल टॅक्स साठी नेव्हिगेशन सिस्टीम; किलोमीटर नुसार भरा पैसे

नव्या सिस्टीमवर प्राथमिक स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली आहे आणि प्रायोगिक तत्वावर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांचा ग्रीन सिग्नल (GREEN SIGNAL) मिळाल्यानंतर तत्काळ नेव्हिगेशन सिस्टीम टोल वसुलीसाठी (TOLL TAX) कार्यान्वित केली जाईल. नव्या सिस्टीम नुसार वाहनाने कापलेल्या अंतराच्या आधारावर टोल टॅक्सची आकारणी केली जाईल.

Fastag : ‘फास्टॅग’ हद्दपार, टोल टॅक्स साठी नेव्हिगेशन सिस्टीम; किलोमीटर नुसार भरा पैसे
‘फास्टॅग’ हद्दपार, टोल टॅक्स साठी नेव्हिगेशन सिस्टीम; किलोमीटर नुसार भरा पैसे
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 30, 2022 | 11:18 PM
Share

नवी दिल्ली– टोलवर टॅक्स वसुलीसाठी प्रचलित फास्टॅगची सिस्टीम (FASTTAG SYSTEM) हद्दपार होण्याची शक्यता आहे. टोलवर वाहनांच्या रांगापासून सुटका करण्यासाठी हायटेक सिस्टीम वापरली जाणार आहे. आघाडीच्या देशांत वापरण्यात येणाऱ्या नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सिस्टीमवर प्राथमिक स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली आहे आणि प्रायोगिक तत्वावर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांचा ग्रीन सिग्नल (GREEN SIGNAL) मिळाल्यानंतर तत्काळ नेव्हिगेशन सिस्टीम टोल वसुलीसाठी (TOLL TAX) कार्यान्वित केली जाईल. नव्या सिस्टीम नुसार वाहनाने कापलेल्या अंतराच्या आधारावर टोल टॅक्सची आकारणी केली जाईल. सध्याच्या फास्टॅग प्रणालीनुसार एक वेळ टोल टॅक्सची कपात केली जाते. महामार्गावरुन धावणाऱ्या गाडीसाठी टोल प्लाझावर विशिष्ट स्वरुपाच्या रकमेची फास्टॅग अकाउंट मधून कपात केली जाते. या प्रणालीनुसार वाहनाने कापलेल्या अंतराचा आधार घेतला जात नाही. मात्र, नेव्हिगेशन सिस्टीम वर किलोमीटरच्या आधारावर पैसे घेतले जातील.

युरोपीय राष्ट्र नेव्हिगेशनवर

नव्या प्रणालीनुसार, महामार्ग किंवा द्रूतगती मार्गावर निर्धारिक प्रवासाच्या किलोमीटर नुसार टोल टॅक्स अदा करावा लागेल. किलोमीटर आधारावर टोल टॅक्स प्रणाली युरोपीय राष्ट्रांत यशस्वी ठरली आहे. भारतात देखील नवी प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी वेगवान हालचाली घडत आहेत. जर्मनी 99 टक्के गाड्यांत नेव्हिगेशन सिस्टीम द्वारे टोल आकारणी केली जाते.

फास्टॅग कसा?

फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक ‘इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली’ आहे. हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते. याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून वर्ष 2014 मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली.

नवी सिस्टीम कशी?

महामार्ग किंवा द्रूतगती मार्गावर गाडीने प्रवास सुरू केल्यास टोल मीटर ऑन होईल. प्रवास संपल्यानंतर नेव्हिगेशन सिस्टीमद्वारे पैसे कपात केले जातील. तुम्ही केलेल्या प्रवासानुसारच पैसे कपात केले जातील. भारतात सध्या 97 टक्के गाड्यांत फास्टॅग लावण्यात आले आहे आणि त्यानुसारच पैसे घेतले जातात.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल