AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड वेगाने तुफान वादळ धडकणार, मोठं संकट येणार? कोणत्या राज्यांना धोका? काय आहे हवामानाचा अंदाज?

प्रंचड वेगाने तुफान वादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा भारताील काही राज्यांना धोका आहे. जाणून घ्या नेमका काय आहे अंदाज?

प्रचंड वेगाने तुफान वादळ धडकणार, मोठं संकट येणार? कोणत्या राज्यांना धोका? काय आहे हवामानाचा अंदाज?
storm newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 5:11 PM
Share

भारतात नैऋत्य मोसमी पाऊस देशातून परत जाण्याची वेळ आली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस परत जाण्याची वेळ ही 19 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्याचदरम्यान दुसरीकडे देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत देशभरातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर थायलंडमधील चक्रीवादळ हे 18 सप्टेंबर रोजी उत्तर अंदमान समुद्रापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ पुढील तीन-चार दिवसांत पश्चिम-वायव्य दिशेने दक्षिण, ओडिशा , उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकू शकते. हवामान विभागाने स्पष्ट केले की, आता 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान देशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागने 18 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे 18 सप्टेंबर ते 23-24 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीर, लडाख,गिलबिट इत्यादी भागात पावसाची शक्यता आहे. तर 18 ते 24 सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या काळात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 18 ते 19 दरम्यान हरियाणा, चंदीगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, 18 ते 24 सप्टेंबर रोजी बिहारमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 18 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत किशनगंज जिल्ह्यात पोथियामध्ये 13 सेटिंमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर झारखंडमध्ये 18 ते 23 सप्टेंबर रोजी बहुतेक ठिकाणी हलका पाऊस ते मेधगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी झारखंडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.ओडिशामध्ये 18 ते 23 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 20 ते 23 सप्टेंबर रोजी गंगा खोऱ्यातील पश्चिम बंगालच्या काही भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी