Sangli Crime: सांगलीत 16 लाखांचे कोकेन बाळगणाऱ्या नायजेरीयन तरुणाला अटक, इस्लामपूर पोलिसांची एका महिन्यात दुसरी कारवाई

पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयित व्यक्ती कोकेन हा अंमली पदार्थ घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री पोलीसांनी पेठनाका येथील न्यु मणिकंडन हॉटेलजवळ सापळा लावला.

Sangli Crime: सांगलीत 16 लाखांचे कोकेन बाळगणाऱ्या नायजेरीयन तरुणाला अटक, इस्लामपूर पोलिसांची एका महिन्यात दुसरी कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 11:08 PM

सांगली : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पेठनाका येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे कोकेन अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन तरुणाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. एडवर्ड जोसेफ इदेह (35) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन तरुणाचे नाव आहे. सध्या तो बंगळुरु येथे राहतो. त्याच्याकडे 164 ग्रॅमच्या कोकेन कॅप्सुल मिळून आल्या आहेत. न्यायालयाने त्याला 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपीला पकडले

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमध्ये एक संशयित व्यक्ती कोकेन हा अंमली पदार्थ घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री पोलीसांनी पेठनाका येथील न्यु मणिकंडन हॉटेलजवळ सापळा लावला. पुणे ते बेंगलोर जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्समधून आरोपी प्रवास करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शर्मा ट्रॅव्हल्सच्या बसची झडती घेतली. पोलिसांना एक संशयास्पद नायजेरियन तरुण बसमध्ये आढळला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये एक सनसिल्क ब्लॅकशाईन शॅम्पूची 650 मिलीची काळ्या रंगाची बाटली आढळून आली. या बाटलीमध्ये कोकेन अंमली पदार्थाच्या 15 कॅप्सुल मिळून आल्या. हे कोकेन सुमारे 16 लाख 30 हजार रुपये किंमतीचे आहे. पोलिसांनी सदर नायजेरियन तरुणाला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात केला आहे.

एका महिन्यातील दुसरी घटना

दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वाघवाडी फाटा येथे बसने मुंबई ते बेंगलोर प्रवास करीत 11 लाख रुपयांचे कोकेन घेवून जाणाऱ्या टांझानियाच्या तरुणास पोलीसांनी जेरबंद केले होते. त्याच्याकडे 109 ग्रॅम कोकेन मिळाले होते. दरम्यान एका महिन्यात हा दुसरा परदेशी तरुण कोकेन घेवून जाताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. (Nigerian youth arrested for carrying cocaine worth Rs 16 lakh in Sangli)

इतर बातम्या

UP Crime : उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

Rajsthan Crime : आधी दारु पाजली मग हातोड्याने वार करुन वडिलांची हत्या, वाचा नेमकं काय घडलं की मुलाने उचलले हे टोकाचे पाऊल