घरात कुठेही लपू द्या साप, फक्त 5 रुपये खर्च; पळत घराबाहेर निघणार, पुन्हा आयुष्यात कधीच दिसणार नाहीत
अनेकदा साप घरात घुसण्याच्या देखील घटना घडतात. हे साप अशा जागी लपून बसतात, जिथे सहजासहजी आपली नजर जात नाही, अनेकदा असे साप दिवसा लपून बसतात, आणि रात्री शिकारीच्या शोधात बाहेर पडतात.

आपलं घर जर थोडं आऊट साईटला असेल किंवा एखाद्या जंगल परिसरात, अडचणीच्या ठिकाणी असेल तर अशावेळी अनेकदा घरात साप घुसण्याच्या घटना देखील घडतात. विशेष: फार्म हाऊसमध्ये अशा घटना प्रमुख्याने घडतात. भारतामध्ये सापांच्या अशा काही जाती आढळून येतात, ज्या दिवसभर अशा ठिकाणी लपून बसतात, जिथे सहजासहजी कोणाचीही नजर जाणार नाही, आणि रात्रीच्या वेळी त्या शिकारीच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे अशा सापांपासून काळजी घेणं गरजेचं असतं. साप घरात येऊ नये, म्हणून आजू बाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे, परंतु तुम्ही इतरही काही उपायांच्या मदतीने सापांपासून आपल्या घराचं संरक्षण करू शकतात. यासाठी फार खर्च देखील येत नाही.
काही विशिष्ट प्रकारच्या उग्र वासाचा सापांना प्रचंड त्रास होतो, त्यामुळे ते अशा ठिकाणी येत देखील नाहीत, अथवा त्या परिसरात कुठेही लपून बसले असतील तर ते तिथून दूर निघून जातात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे कांदा, लसून आणि आले यांचं मिश्रण असलेली पेस्ट, जर तुम्ही या मिश्रणाची पातळ पेस्ट केली आणि संपूर्ण घरात अडचणीच्या ठिकाणी फवारली तर समजा तुमच्या घरात एखादा साप लपलेला असेल तर तो ती जागा सोडून दूर निघून जाईल. कारण सापांना याच्या उग्र वासाचा त्रास होतो. त्यासाठी फार खर्च करण्याची देखील गरज नाही.
विशेष: मण्यार सारखे जे साप असतात, ते दिवसा लपून बसतात, आणि रात्रीच्या वेळी आपल्या शिकारीसाठी बाहेर पडतात. मण्यार हा अत्यंत विषारी साप असतो. त्यामुळे अशा सापांना आपल्या घरापासून दूर ठेवण्यासाठी हा उपाय उपयोगाचा ठरवू शकतो. मण्यार प्रमाणेच इतरही प्रजातीचे साप घरात घुसण्याची शक्यता असते, अशावेळी जिथून जिथून हे साप तुमच्या घरात येऊ शकतात, अशी शक्यता आहे, तिथे तिथे ही पेस्ट फवारावी, ज्यामुळे साप घरात येणार नाहीत. आणि समजा तुम्हाला कुठे तुमच्या घरात साप दिसलाच तर त्याला न मारता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते त्याला पकडून सुरक्षित जागी सोडतील.