
नवरात्रोत्सव सुरु होताच युपीत राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु झाले आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात ९ दिवसांपर्यंत नॉन-व्हेजवर बंदी लावण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात हिंदू संघटनांनी घोषणा केली आहे की गरबा आणि दांडिया उत्सवात बिगर-हिंदूंना प्रवेश दिला जाणार नाही. या प्रकरणात आता समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते एस.टी.हसन यांचे वक्तव्य समोर आले आहे.
सपाचे माजी खासदार एस.टी.हसन यांनी नॉन व्हेज वरील बंदी संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले तुम्ही कोण आहात जेवणावर बंदी घालणारे ? मुसलमान तर घरी फ्रीजर ठेवून खातील. परंतू 5 – स्टार हॉटेलातील बीफवर कोण बंदी घालणार ? काय ड्रामेबाजपणा सुरु आहे. नवरात्र आणि कावड यात्रेत मांस विक्रीच्या दुकानांवर बंदी मागे खरे तर मतांचे राजकारण सुरु आहे. जर भक्ती आणि श्रद्धा असेल फाईव्ह स्टार हॉटेलातील बीफ विक्रीवर बंदी का नाही ?
समाजवादी पार्टीचे नेते हसन यांनी नवरात्री दरम्यान मांस विक्रीवरील बंदीवर कठोर टीका केली आहे. ते म्हणाले की देश सर्वांचा आहे. केवळ मुसलमान नव्हे तर ख्रिश्चन आणि शीख देखील नॉन व्हेज खातात. नवरात्रीत आणि कावड यात्रेत त्यांनी नॉन-व्हेजसाठी कसे रोखले जाऊ शकते. तुम्ही कोण आहात बंदी लादणारे ? हिंदू नवरात्र आणि कावड यात्रेत नॉन-व्हेज खात नाहीत ? असाही सवाल त्यांनी केला.
सपाच्या या माजी खासदाराने आरोप लावताना हे सर्व मतांच्या ध्रुवीकरणासाठी सुरु आहे. फाईव्ह स्टारमधील बीफ विक्री का नाही थांबवत ? एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे धंदा सुरु आहे. भारता जगातला दुसरा सर्वात मोठा बीफ निर्यातदार आहे , मग ही नाटके का सुरु आहेत ?
येथे पाहा पोस्ट –
#WATCH | On demands for meat shops to be shut during Navratri, SP leader ST Hasan says, “This country belongs to everyone…Not just Muslims but even Christians and Sikhs consume non-veg. How can you stop anyone from consuming it during Navratri or Kanwar Yatra? Who are you to do… pic.twitter.com/VZBh6qM0KC
— ANI (@ANI) September 22, 2025
मध्य प्रदेशातील गरबा उत्सवात बिगर हिंदूंना लावलेल्या बंदीला मात्र त्यांनी पाठींबा दिला आहे. ते म्हणाले की,’ मी या निर्णयाच्या बाजूने आहे. मुसलमानांनी यात सामील होऊ नये. मुसलमान मुलांनी तेथे अजिबात जाऊ नये. मुसलमान मुलांना विनंती आहे की त्यांनी हिंदू मुलींना आपली बहिण समजावे.’ लव्ह जिहादचा मुद्यावर बोलताना हसन म्हणाले की केवळ व्होट पोलरायझेशन करण्यासाठी हा मुद्दा उठवला आहे.
हसन म्हणाले की कोणालाही अधिकार नाही कोणाच्या आईबद्दल अपमानजनक बोलण्याचा. पीएम मोदी यांच्या माताजीचा अपमान जो कोणी करत असेल त्याला थांबवून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली पाहीजे.
परराष्ट्रनिती संदर्भात बोलताना एस.टी. हसन यांनी केंद्रावर टीका केली. अमेरिकेने एच-1बी व्हिसा शुल्क वाढवल्या प्रकरणात त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली. परराष्ट्र निती या सरकारकडे नाहीच. ट्रम्प वारंवार आपला अपमान करत आहेत. आणि पीएम देशाची दीशाभूल करीत आहेत. आपल्या पीएमनी ट्रम्पसाठी कँपेन देखील केले होते. या मैत्री अंतर्गत देशाला चूना लावला जात आहे अशीही टीका त्यांनी केली.