आता राज्यसभेत घोषणा देण्यावरही चाप, थँक्स, जयहिंद, वंदे मातरम… नकोच; काय आहेत नवीन नियम?
संसदेच्या हिवाळी अधिवेशन सुरु होणार असतानाच राज्यसभेने संसद सदस्यांसाठी एक आचार संहिता जाहीर केली आहे. यात अनेक शब्दांवर बंदी घातली आहे. तसेच कठोर नियमावली घालण्यात आली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या आधीच एक नवा वाद उभा राहिला आहे. यास कारणीभूत ठरले आहे राज्यसभेने संसद सदस्यांच्या वागणूकी संदर्भात जारी केलेले एक बुलेटीन. या बुलेटीन संदर्भात टीएमसी आणि काँग्रेस सह विरोधी दलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बुलेटीनमध्ये संसद सदस्यांना काही निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार संसद सदस्यांनी थँक्स, थँक यू, जय हिंद आणि वंदे भारत सारख्या शब्दांचा वापर करु नये असा सल्ला देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की संसदेची परंपरा भाषणाच्या शेवटी अशा स्लोगनला परवानगी देत नाही.त्यामुळे भाषणाचा शेवट अशा शब्दांनी करु नये म्हटले आहे.
बुलेटिनचा दुसरा सर्वात मोठा निर्देश हा आहे की एखादा सदस्याने कोणा मंत्र्यावर टीका केली. तर त्याने मंत्र्यांनी उत्तर देत असताना संसदेत उपस्थित रहाणे अनिवार्य केले गेले आहे. तसेच संसदेच्या सदनात येऊन कोणत्याही वस्तूंचे प्रदर्शन करण्यास देखील मनाई केली आहे.याशिवाय संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे वर्तन करण्यापासून संसद सदस्यांनी दूर रहावे.
राज्यसभेने या पावलांचा जोरदार विरोध केला आहे
या निर्देशांनंतर विरोधी पक्षाने राज्य सभेच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जय हिंद आणि वंदे मातरम बोलण्यास विरोध करण्याला बंगाली अस्मितेशी जोडून जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपाने वादावर संयत प्रतिक्रीया दिली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की राज्यसभेच्या निर्देशांत कोणतीही नवीन गोष्ट नाही हे संसदीय परंपरानुरुप आहे.
अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करु नये
शपथ ग्रहणाच्या वेळी जय हिंद आणि वंदे भारत बोलण्याची परंपरा आहे. परंतू भाषणाच्या शेवटी अशा उद्घोषणा करणे अनेकवेळा संसदेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण करते ,त्यामुळे बुलेटिनमध्ये दिले गेलेले निर्देश पूर्णपणे उचित आहेत असा भाजपाचा तर्क आहे.राज्यसभेच्या बुलेटिनमध्येही हे सांगितले आहे की संसद सदनाच्या बाहेर अध्यक्षांच्या निर्णयांवर टीका करु नये.
टीका करायची असेल तर उत्तर ऐकायला हजर राहा
त्यांनी हेही आठवण करुन दिले की सभागृहात कोणताही पुरावा सादर करण्यापासून दूर राहावे. जर एखादा सदस्य दुसऱ्या सदस्यांवर टीका करत असेल तर त्याला संबंधित सदस्याचे उत्तर ऐकण्यासाठी सभागृहात हजर राहावे लागणार आहे, ही त्याची जबाबदारी आहे. उत्तरावेळी गैरहजेरी ही संसदीय शिष्टाचाराचे उल्लंघन मानले जाईल. या वेळी पहिल्यादा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन वरिष्ठ सभागृहात अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार आहेत.
