आता रात्रीच्या वेळी देखील वैष्णोदेवी पवित्र गुहेचे दर्शन, नवे वेळापत्रक काय ?

माँ वैष्णोदेवी धामच्या प्राचीन आणि पवित्र गुफेचे दर्शन आता श्रद्धाळू रात्रीचे देखील करु शकणार आहेत. या पवित्र गुहेला वर्षातून केवळ दोन महिन्यांसाठी भक्तांसाठी उघडले जात असते. आता रात्रीच्या वेळी देखील भक्तांना पवित्र गुहेचे दर्शन घेता येणार आहे.

आता रात्रीच्या वेळी देखील वैष्णोदेवी पवित्र गुहेचे दर्शन, नवे वेळापत्रक काय ?
Vaishno Devi Dham
| Updated on: Jan 22, 2026 | 3:35 PM

वैष्णो देवी धाम जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता वैष्णोदेवीला दर्शनाला जाणाऱ्या भक्तांना पवित्र गुहेचे दर्शन आता रात्रीचे देखील करता येणार आहे. गेल्या मंगळवारी रात्री 10:30 ते 12:30 वाजताच्या दरम्यान भक्तांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले. श्रद्धाळूंसाठी मकर संक्रातीनिमित्त दर्शन करण्याची मूभा देण्यात आली. आता त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मंदिराच्या गुहेचे दर्शन मिळण्याची शक्यता आहे.

सोन्याने मढलेल्या पवित्र आणि प्राचीन गुफेचे दरवाजे मकर संक्रांतीच्या पूजेवेळी श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने उघडले होते. भक्तांची गर्दी खूप झाल्याने पवित्र गुहेला मर्यादित वेळेसाठी भाविकांसाठी उघडण्यात आले. आता श्रद्धाळूंसाठी सकाळच्या वेळी 10:15 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि रात्री 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत दर्शनासाठी दरवाजे उघडण्यात आले होते.

21 जानेवारीला 13 हजार भक्तांनी दर्शन घेतले

मीडियाच्या बातमीनुसार गेल्या बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 13000 हून अधिक श्रद्धाळूंनी दर्शन घेतले होते. तर 20 जानेवारी रोजी सुमारे 18200 भक्तांनी माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. अधिकाधिक भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी श्राईन बोर्डाने हा निर्णय घेतला होता.त्यामुळे रात्रीच्यावेळी दरवाजे उघडून अधिकाअधिक भक्तांना दर्शनाची संधी देण्यात आली.

वर्षातून दोनदा उघडते गुफा

माँ वैष्णो देवीची पवित्र गुहा वर्षातून 2 महिन्यासाठी उघडले जाते. दरवर्षी सर्वसाधारण गुहा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात उघडली जाते. कारण यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी कमी असते. रोज सुमारे 20 हजार श्रद्धाळू दर्शनासाठी माँ वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहचतात.

ऑनलाईन करा ( यज्ञ ) हवन

भक्तांच्या सुविधेसाठी नोव्हेंबर 2025 पासून श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाने गर्भगृहात हवन करण्याची नविन सुविधा सुरु केली होती. ज्याअंतर्गत श्रद्धाळू आता ऑनलाईन आणि ऑफलाईन फीवरुन हवन ( यज्ञ ) करु शकतात. या हवनची फी प्रति श्रद्धाळू 3100 आणि दोन श्रद्धाळूसाठी 5100 रुपये ठेवण्यात आली आहे.