AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत या टॉप – १० शहरातील रस्त्यांवरुन जुनी वाहने हद्दपार होणार?, काय होणार नेमके ?

दिल्लीसह भारतातील अनेक शहरात जुन्या वाहनांबाबत नवे धोरण आखले आहे. राजधानी दिल्लीत १ जुलैपासून जुन्या कारना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. इतर टॉप - १० शहरात काय आहे धोरण ते पाहूयात...

दिल्लीपासून मुंबईपर्यंत या  टॉप - १०  शहरातील रस्त्यांवरुन जुनी वाहने हद्दपार होणार?, काय होणार नेमके ?
| Updated on: Jul 01, 2025 | 6:40 PM
Share

देशातील अनेक शहरातून जुन्या गाड्याबाबतच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. दिल्लीत १ जुलैपासून १० वर्षे जुन्या डिझल आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांना इंधन दिले जाणार नाही. बंगळुरु, मुंबई, कोलकाता, सूरत, पुणे आणि अहमदाबादमध्ये देखील जुन्या वाहनांबाबत नवीन नियम लागू झाले आहेत. चला तर पाहूयात तुमच्या शहरात वाहनांबाबत काय नियम बदल झाला आहे.

दिल्लीसह भारतातील अनेक शहरात जुन्या कार संदर्भात नवीन धोरण आखण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत १ जुलैपासून जुन्या कारना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. प्रदुषण आणि वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय वाहन स्क्रॅप नीती ( National Vehicle Scrappage Policy ) ठरविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. चला तर टॉप -१० शहरातील जुन्या वाहनांचे भविष्य काय असणार ते पाहूयात….

दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन बंदी

1 जुलैपासून राजधानी दिल्लीतील रस्त्यांवर १० वर्षे जुन्या डिझल वाहनांना आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांना इंधन दिले जाणार नाही. या योजनेच्या अमलबजावणीसाठी दिल्लीच्या जवळपास सर्व ५०० ते ५२० पेट्रोल पंपावर ऑटोमेटीक नंबर प्लेट ओळखणारे कॅमेर लावण्यात आले आहेत. हे कॅमेर स्वयंचलितपणे वाहनांच्या नंबरप्लेट वरुन त्यांचे रजिस्ट्रेशन कधी झाले हे ओळखणार आहेत.

मुंबईत फिटनेस टेस्ट गरजेची

मुंबईत राष्ट्रीय वाहन स्क्रॅप पॉलिसी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत १५ वर्षांहून अधिक जुन्या खाजगी पेट्रोल वाहनांना आणि १० वर्षांहून अधिक जुन्या डीझल वाहनांची फिटनेस टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या टेस्टमध्ये वाहन फेल गेले तर त्या वाहनाला स्क्रॅपमध्ये टाकावे लागणार आहे.

जयपुरमध्ये कमर्शियल कारवर कार्रवाई

जयपुरमध्ये कमर्शियल डीझल वाहनांना १५ वर्षांची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. यापेक्षा जास्त जुन्या वाहनांना रस्त्यावर उतरण्यास परवानगी नाहीए. १५ वर्षे जुन्या वाहनांची फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे.खाजगी वाहनांना नॅशनल व्हेईकल पॉलिसी लागू करण्यात आली आहे.

पुण्यात री-रजिस्ट्रेशन

पुणे येथे १५ वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट, री-रजिस्ट्रेशन आणि पर्यावरण टॅक्स द्यावा लागत आहे. या सर्व सोपस्कारातून पूर्ण पार पडलेल्या वाहनांनाच रस्त्यावर एण्ट्री आहे.

सूरत

सूरतमध्येही नॅशनल व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी लागू आहे.१५ वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे आहे. जर गाडी टेस्टमध्ये फेल गेली तर तिला रस्त्यावर उतरवता येणार नाही.

अहमदाबादेत नॅशनल व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी

अहमदाबाद येथे वाहनांबाबत कोणतीही वयोमर्यादा नाही. येथे नॅशनल व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत काम होत आहे. १५ वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे आहे. गाड्यांना आरटीओच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

हैदराबाद

हैदराबादेत १ जुलैपासून नवा नियम लागू झाला आहे. यानुसार १५ वर्षे जुन्या वाहनांना फिटनेस टेस्ट पास करणे अनिवार्य आहे. जर गाडी टेस्टमध्ये फेल झाली तर ती स्क्रॅपमध्ये पाठविली जाणार आहे. सरकारी वाहनांसाठी तर नियम आणखी कठोर आहे.१ ५ वर्षे जुनी सरकारी वाहनांना रस्त्यावर उतरवण्यास सक्त मनाई आहे.

बंगलुरुत ग्रीन टॅक्स

बंगलुरुत जुन्या गाड्यांना फिटनेस टेस्ट पास करणे गरजेचे आहे. सरकारने जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावला आहे. जर गाडी वाहन १५ वर्षे जुने असेल तर तुम्हाला ग्रीन टॅक्स द्यावा लागू शकतो. जर गाडी टेस्टमध्ये फेल झाली तर स्कॅपमध्ये पाठविली जाते.

कोलकाता आणि चेन्नई

कोलकाता-हावडात वाहनांचा वयाचा नियम प्रस्थापित आहे.खाजगी वाहनांना २० वर्षांच्या वयोमर्यादेचा प्रस्ताव NGTसमोर ठेवला आहे. सध्या कोलकाता १५ वर्षे जुन्या वाहनांवर बंदी आहे. चेन्नईत काही विशेष नियम नाही. १५ वर्षु जु्न्या वाहनांना राष्ट्रीय धोरणानुसार फिटनेस टेस्ट द्यावीच लागते. जर वाहन टेस्टमध्ये फेल गेले तर स्क्रॅपमध्ये टाकले जाते.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.