महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलो वस्तू काढल्या

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एका महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलोच्या वस्तू शस्त्रक्रियेतून काढण्यात आल्या. संबंधित महिला रस्त्यावर सापडली होती. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी दरम्यान तिच्या पोटाचा एक्स-रे काढला. या एक्स-रेमधून असं काही समोर आलं, की ते पाहून डॉक्टरही चक्रावले. महिलेच्या पोटात  अनेक अशा वस्तू आढळल्या […]

महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलो वस्तू काढल्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एका महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलोच्या वस्तू शस्त्रक्रियेतून काढण्यात आल्या. संबंधित महिला रस्त्यावर सापडली होती. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी दरम्यान तिच्या पोटाचा एक्स-रे काढला. या एक्स-रेमधून असं काही समोर आलं, की ते पाहून डॉक्टरही चक्रावले. महिलेच्या पोटात  अनेक अशा वस्तू आढळल्या ज्यावर डॉक्टरांनाही विश्वास बसला नाही आणि डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

काय होतं नेमकं पोटात?

अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. अहमदाबाद येथील रस्त्यावर सापडलेली ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे बोललं जात आहे. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनतर एक्स-रे काढण्यात आले. एक्स-रेच्या रिपोर्टमध्ये तिच्या पोटात चैन, पीन, हेअरपीन आणि काही स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंचा समावेश असल्याचं दिसलं. तिच्या पोटातून 25 ते 30 तुकडे काढण्यात आले. या सर्व वस्तूंचे वजनही दीड किलो आहे. डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडली आहे.

 

काय म्हणाले डॉक्टर?

“संबधित महिला ही मानसिक रुग्ण आहे. अहमदाबाद येथील रस्त्यावर ती सापडली असता काही नागरिकांनी तिला रुग्णालयात आणलं. तपासणी दरम्यान तिचे पोट का दुखत आहे याचा खुलासा झाला. एक्स-रेच्या रिपोर्टमध्ये पीन, हेअर पीन आणि स्टेनलेस स्टील वस्तूंचा समावेश असल्याचं दिसून आलं. तब्बल दीड किलोच्या या सर्व वस्तू होत्या.” असं डॉक्टरांनी सांगितलं.