Operation Lotus : राजधानी नवी दिल्लीत ऑपरेशन लोटस फेल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खळबळजनक ट्वीट

मनीष सिसोदिया यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजपकडून सीएम पदाची ऑफर होती. पक्षात फूट पाडल्यास त्यांच्यावरील आरोप परत घेतले जातील, असं सिसोदिया यांना सांगण्यात आलं होतं.

Operation Lotus : राजधानी नवी दिल्लीत ऑपरेशन लोटस फेल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खळबळजनक ट्वीट
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खळबळजनक ट्वीट
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 6:38 PM

नवी दिल्ली : नवी दिल्ली : आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर राजधानीत ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप केलाय. केजरीवाल यांच्या मते, भाजपनं दिल्लीत सरकार (Delhi Government) पाडण्याचा प्रयत्न केला. सीबीआय (CBI) छापे हा भाजपचा कट होता. दिल्लीत दारु घोटाळ्याची तपासणी होत आहे. त्यामुळं आम आदमी पक्ष ( Aam Party) आणि भारतीय जनता पक्षात तेढ निर्माण होत आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीत ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप केला. दिल्लीत सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला. यामुळं पुन्हा भाजपच्या ऑपरेशनट लोटसची चर्चा सुरू झाली.

सरकार पाडण्यासाठी छापा

अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलंय की, दिल्लीत ऑपरेशन लोटस फेल झालं. याचा अर्थ सीबीआय, ईडी रेडचा दारू आणि भ्रष्टाचार प्रकरणाशी काहीही घेणंदेणं नाही. असाच ईडीचा वापर दुसऱ्या राज्यात करण्यात आला. मनीष सिसोदिया यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजपकडून सीएम पदाची ऑफर होती. पक्षात फूट पाडल्यास त्यांच्यावरील आरोप परत घेतले जातील, असं सिसोदिया यांना सांगण्यात आलं होतं. यासंदर्भात सिसोदिया यांनी म्हटलं होतं की, आपमध्ये फूट पाडून भाजपात यावं. सीबीआय, ईडीच्या केसेस बंद केल्या जातील. यावर सिसोदिया म्हणाले की, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे. भ्रष्टाचाऱ्यांसोर झुकणार नाही. माझ्याविरोधात असलेल्या सर्व केसेस खोट्या आहेत.

मनीष सिसोदियांचा आरोप काय

सिसोदिया म्हणाले की, त्यांच्याकडं भाजप नेत्यानं दिलेल्या ऑफरची रेकॉर्डिंग आहे. वेळ आल्यासं ती रेकॉर्डिंग सर्वांसमोर आणणार आहे. मनोज तिवारी म्हणाले की, सिसोदिया यांचा फोन सीबीआयजवळ आहे. मग रेकॉर्डिंग सिसोदिया यांच्याकडं कसं आहे.

दारुधोरणावर केजरीवाल म्हणाले…

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आज गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधूनचं भाजपवर हल्ला केला जात आहे. दारु घोटाळ्यावर बोललं जातंय. भ्रष्टाचारावरही प्रहार केला जातोय. केजरीवाल म्हणाले, आम्ही दारुबंदीच्या धोरणाला सुरूच ठेऊ. पण, अवैधरित्या दारुचा धंदा सुरू ठेवणार नाही. 850 दारुची दुकानं सुरू होणार होती. 500 दुकानं सुरू झालीत. केंद्राच्या दबावामुळं अधिकारी लीलावासाठी मनाई करत आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.