AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Midnight Hammer : इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकन फायटर जेट्स भारतातून गेली का? सत्य काय?

Operation Midnight Hammer : अमेरिकेने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाइट हॅमर केलं. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री अमेरिकेने आपल्या B-2 बॉम्बर विमानातून इराणमध्ये काही हजार किलोचे बॉम्ब टाकले. या ऑपरेशनसाठी अमेरिकेने भारताची हवाई हद्द वापरल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. नेमकं यात सत्य काय? ते PIB ने सांगितलं आहे.

Operation Midnight Hammer : इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकन फायटर जेट्स भारतातून गेली का? सत्य काय?
| Updated on: Jun 23, 2025 | 9:15 AM
Share

इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकन एअर फोर्सने भारताची हवाई हद्द वापरल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अमेरिकेने शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री इराणच्या फॉर्डो, नतांज आणि इस्फाहान या अण्विक प्रकल्पांवर हल्ले केले. अमेरिकेने त्यासाठी खास आपलं B-2 स्पीरिट बॉम्बर विमान वापरलं. हे तिन्ही अण्विक प्रकल्प समूळ नष्ट करण्यासाठी 13,600 किलो वजनाचे GBU-57 हे शक्तीशाली बॉम्ब टाकले. अमेरिकेने इराणवरील या हल्ल्यासाठी भारतीय हवाई हद्दीचा वापर केल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण भारत सरकारने रविवारी या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याच स्पष्ट केलय.

भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो PIB ने हे दावे, चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ही खोटी, तथ्यहीन माहिती असल्याच म्हटलं आहे. ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकेने भारतीय हवाई हद्दीचा वापर केला नाही, असं पीआयबीने म्हटलं आहे. “इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेने भारतीय एअरस्पेसचा वापर केला, रविवारच्या हल्ल्याचा भारताचा सहभाग आहे” असे दावे सोशल मीडिया X वर करण्यात आले होते. म्हणून PIB ने स्पष्टीकरण देऊन हे सर्व दावे खोडून काढले. अमेरिकेने ना भारताची हवाई हद्द वापरली, ना यात भारत सरकारचा कुठला सहभाग आहे, हे PIB ने स्पष्ट केलं.

फॅक्ट चेकमध्ये काय म्हटलय?

यूएस जॉइंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमनच्या पत्रकारपरिषदेचा पीआयबीने हवाला दिला. अमेरिकन विमानांनी कुठला पर्यायी मार्ग निवडला, त्याची माहिती यूएस जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली. त्यामुळे सोशल मीडियावरील भारतीय सहभागाच्या दाव्यांना अर्थ नाही. “इराण विरुद्धच्या ऑपरेशन हॅमरसाठी अमेरिकन विमानांनी भारताची हवाई हद्द वापरली असा अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन दावा करण्यात आलेला. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकेने भारताची हवाई हद्द वापरली नाही. अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल डॅन केन यांनी अमेरिकेन विमानांनी कुठला मार्ग निवडला ते सांगितलय” सरकारच्या फॅक्ट चेक युनिटने X वर ही माहिती दिलीय.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.