
जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी २२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय आणि एक नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला भारताने १५ दिवसांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ९ दहशतवादी तळं उद्धवस्त केले. याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर भारताने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली. आता परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने नुकतंच याबद्दलची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी “आमचं टार्गेट ठरलेलं आहे. मिल्ट्री टार्गेट नाही. फक्त पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट आहे”, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले.
“२२ एप्रिलच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर उत्तर देणं सुरू झालं आहे. काल भारतीय सैन्याने कारवाई करून उत्तर दिलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत आम्ही पहलगामचा विषय काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाकिस्तानने टीआरएफचा विषय काढला. टीआरएफला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यास पाकिस्तानने विरोध केला. त्यानंतर २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये टीआरएफने हल्ला केला. बॉर्डर क्रॉस करून हा हल्ला झाला. भारतीय रिस्पॉन्स सटिक आहे. मेजर आहे. आमचा हेतू फक्त उत्तर देणं आहे. आमचं टार्गेट ठरलेलं आहे. मिल्ट्री टार्गेट नाही. फक्त पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट आहे”, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी म्हटले.
“पाकिस्तान अनेक वर्षापासून दहशतवादी कारवाया करत आहेत. एलओसीवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी करण्यात येत आहे. साजिद मीरचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्याने यापूर्वीच एक गोष्ट कबूल केली आहे. ती म्हणजे या ग्रुपसोबत त्यांचे काय संबंध राहिलेत. पाकिस्तानचा एक दावा आहे. आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी. संयुक्त तपास व्हावा. पहलगाम हल्ल्याचा तुम्हाला याचा इतिहास माहीत आहे. ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे. पाकिस्तान कसा वागतो ते माहीत आहे”, असेही विक्रम मिसरी म्हणाले.
“मुंबई हल्ला, पठाणकोट हल्ला आणि इतर हल्ल्यात इंडियाने सहकार्याची भूमिका घेतली आणि फॉरेन्सिक पुरावे दिले. मुंबईवरील हल्ल्यावेळी लश्कर ए तोयबाचा अतिरेकी पकडला. अनेक पुरावे गोळा केला. केसेस नोंदवल्या. पण त्यात पुढे काही झाले नाही. तसेच पाकिस्तान सातत्याने तपासापासून दूर पळत राहिला. पठाणकोटवेळी संयुक्त चौकशी समिती स्थापन झाली होती. दोन पाकिस्तानी टीमने डिटेल्स, कॉल रेकॉर्ड आणि डीएनए घेतले. आपणही त्यांना पुरावे दिले. लष्कर आणि जैश ए मोहम्मदचा हल्ल्यात हात असल्याचं सांगितलं. पण त्यात पुढे काही घडलं नाही”, असेही त्यांनी म्हटले.