AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMACC च्या वतीनं न्यू यॉर्कमध्ये ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंडचं’ आयोजन करण्यात येणार

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) कडून 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड' या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क शहरामध्ये 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

NMACC च्या वतीनं न्यू यॉर्कमध्ये 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंडचं' आयोजन करण्यात येणार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2025 | 9:24 PM
Share

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) कडून ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड’ या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क शहरामध्ये 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये भारताच्या समृद्ध कलाकृती आणि संस्कृतीचं जगाला दर्शन होणार आहे. लिंकन सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संगीत, नाट्य, फॅशन, पाककृती अशा विविध भारतीय कलाकृतीचं प्रदर्श करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाबाबत बोलताना एनएमएसीसीच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी म्हटलं की, “नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इंडिया वीकेंड पहिल्यांदाच न्यू यॉर्क शहरात आयोजित करण्यात येणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध कलाकृती ज्यामध्ये संगीत, नृत्य, फॅशन, पाककृती अशा विविध कला सादर करण्यात येणार आहेत. जगातील सर्वोत्तम कलाकृतींचं भारतात प्रदर्शन करणे आणि भारतातील सर्वोत्तम कलाकृती जगासमोर आणणं हाच ‘NMACC’ चा मुख्य उद्देश आहे. हा विशेष वीकेंड या प्रवासातील पहिलं पाऊल ठरणार आहे. जगातील एक प्रतिष्ठित स्टेज असलेल्या लिंकन सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. न्यू यॉर्क शहर आणि जगासोबत आमच्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीचा वारसा शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे.’असं या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.

12 सप्टेंबर रोजी डेव्हिड एच. कोच थिएटरमध्ये भारतातील सर्वात भव्य नाट्यनिर्मिती असलेल्या ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ या बहुप्रतिक्षित अमेरिकन प्रीमियरने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. फिरोज अब्बास खान यांनी हे दिर्गदर्शित केलं आहे.  हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून, भारतातील विविध कालाकृती आणि संस्कृतीची या निमित्ताने जगाला ओळख होणार आहे.  यामध्ये संगीत, नृत्यू, फॅशन, अशा विविध कला कलांचा समावेश आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!