आता बोला.. ‘ओवैसी हे तर तुलसीरामाचे पणतू!’ मुघलांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या प्रिन्स तुलीचा दावा, पूर्ण वंशावळच ठेवली समोर

| Updated on: Jun 04, 2022 | 3:54 PM

प्रिन्स तुली यांनी जगदगुरु परमहंसाचार्य यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. अयोध्येत जगदगुरु परमहंसाचार्य यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आग्राच्या जातगंज पोलीस ठाण्यात तुली यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आता बोला.. ओवैसी हे तर तुलसीरामाचे पणतू! मुघलांचा वंशज म्हणवून घेणाऱ्या प्रिन्स तुलीचा दावा, पूर्ण वंशावळच ठेवली समोर
Follow us on

लखनौ : एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी हे तुलसीरामाचे पणतू आहेत, असा दावा केला आहे मुघल बादशाहा बाहदूरशाह जफर यांचा पणतू याकूब हबीबुद्दिन तुसी उर्फ प्रिन्स तुली (Prince Tuli) यांनी. यासोबतच त्यांनी ओवैसी यांची पूर्ण वंशावळच दिली आहे. ज्ञानवापी प्रकरणात ओवैसी हे देशातील मुसलमानांचा (Muslims) भडकावत असल्याचा आरोप ही प्रिन्स तुसी यांनी केला आहे. या प्रकरणी ओवेसींवर कारवाईची मागणीही (Demand for Action) त्यांनी केली आहे. ओवैसी यांच्याविरोधात वक्तव्य करण्याची प्रिन्स तुली यांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी ओवैसींवर अगदी शेलक्या शब्दांत टीका केलेली आहे.

जगदगुरु परमहंसाचार्य यांच्यावरही निशाणा

प्रिन्स तुली यांनी जगदगुरु परमहंसाचार्य यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. अयोध्येत जगदगुरु परमहंसाचार्य यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी आग्राच्या जातगंज पोलीस ठाण्यात तुली यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तुली यांनी आपली तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह उत्तर प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठवली आहे. याबाबत प्रिन्स यांनी एक व्हिडिओही तयार केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी भारतमाता की जय अशी घोषणाही दिलेली आहे.

प्रिन्स तुली यांची यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्ये

प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुली हे हैदराबादचे राहणारे आहेत. आणि ते स्वत:ला मुघलांचे वंशज म्हणवून घेतात. 17 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी केलेल्या वक्तव्यात बाबरचा संदर्भ दिला आहे. ते म्हणालेत की- बाबरने मृत्यृवेळी हुमायूशी आपल्या मृत्यूपत्राबाबत चर्चा केली होती. त्यावेळी बाबर म्हणाला होता की, मीर बाकी याने अयोध्येत जे प्रकार केला आहे, त्यामुळे तैमूरच्या पूर्ण खाणदानावर कलंक लागला आहे. जर हुमायूला या देशावर राज्य करायचे असेल तर संत-मंहतांचा आदर कर, असा सल्लाही बाबरने दिल्याचे प्रिन्स तुली यांचे वक्तव्य आहे.

हे सुद्धा वाचा

राममंदिराला बाबरच्या वंशजांचा विरोध नसल्याची भूमिका

इतकेच नाही तर मंदिरांचे संरक्षण करा आणि देशात समान न्यायपद्धतीचा अवलंब कर, असा सल्लाही बाबरने हुमायूला दिला होता. त्यावेळी प्रिन्स तुलीने हेही स्पष्ट केले होते की, विवादित भूमीवर जर रामाचे मंदिर होत असेल तर बाबरचा वंशज म्हणून याबाबत आपल्याला कोणतीही आपत्ती नाही. आणि जर मंदिराची उभारणी होत असेल तर पहिली विट ठेवायला आपण जाऊ, असे वक्तव्यही प्रिन्स तुली यांनी त्यावेळी केले होते.